शौर्यपदक प्राप्त विन कमांडर देवेंद्र औताडे यांचा गणेशनगरच्या शाळेमध्ये भव्य नागरी सत्कार
रयत शिक्षण संस्थेच्या श्री गणेश विद्यालय गणेशनगरचे माजी विद्यार्थी ज्यांनी आपले बालपण श्री गणेश विद्यालय गणेशनगर च्या शाळेमध्ये आपल्या बाल सवंगड्या सोबत कधी मस्ती तर कधी दंगा करत आनंदात खेळीमेळीच्या वातावरणामध्ये घालवले . वेळ पडली तेंव्हा शिक्षकांचा मारही हसत मुखाने सहन केला ऑपरेशन सिंदूर मोहीमेतील शौर्य पदक प्राप्त विंग कमांडर माननीय देवेंद्रजी बाबासाहेब औताडे यांचा श्री गणेश विद्यालय गणेशनगर विद्यालयाच्या प्रांगणामध्ये भव्य नागरिक सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना कमांडर देवेंद्रजी यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला याच विद्यालयाच्या प्रांगणामध्ये मी लहानपणी खूप खेळायचो क्रिकेट खेळायचो बाजारामध्ये मनसोक्त फिरायचे मित्रांसोबत गप्पा मारायचे आणि घरी उशिरा गेल्यामुळे आई-वडिलांचा मारही खायचो या आठवणी सांगितल्या.
आज या शाळेने माझ्यावर केलेल्या संस्कारामुळेच मी आज भारतीय हवाई सेनेमध्ये विंग कमांडर म्हणून देशसेवा करत आहे मला अभिमान वाटतो रयत शिक्षण संस्थेच्या श्री गणेश विद्यालयाचा .गणेशनगर शाळेतील गुरुजनांनी मला घडवले मला सुसंस्कारित केले वक्तृत्व हा माझा आवडीचा विषय होता. विद्यार्थी मित्रांनो तुम्हालाही भविष्यात खूप मोठे व्हायचे असेल तर मोठे स्वप्न पहा जिद्दीने आणि चिकाटीने परिश्रम करा अपयश आले तरी खचून जाऊ नका. आपल्या आई वडिलांचे नाव कमवा गावाचे नाव उंचवा राष्ट्रप्रेम, देशप्रेम यांना प्रथम प्राधान्य दिले पाहिजे.यासाठी आपण प्रसंगी आपल्या प्राणाची आहुती द्यायला तयार झालं पाहिजे ही भारतभूमी माझी माता आहे अशी भावना प्रत्येक भारतीय तरुणांमध्ये असायला पाहिजे असे आव्हान केले.
या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री वसावे के के सर, स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य रावसाहेब पांडुरंग गाढवे पाटील, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष तथा श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिल काका गाढवे पाटील, प्रसिद्ध उद्योजक जयाभाऊ कालेशेठ, वाल्मीक भाऊ गाढवे पाटील, दीपक चोळके ,अमोल कासार ,अमोलभाऊ शेळके, मुकुंद डहाळे, बाळासाहेब देशमुख, जावेदभाई पठाण ,सतीश भट, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांना देवेंद्र साहेब यांच्या तोंडून युद्धभूमीतील थरार प्रत्यक्षात ऐकायला मिळाले सर्व विद्यार्थ्यांनी भारत माता की जय अशा घोषणा देऊन विंग कमांडर देवेंद्रजी औताडे यांचा जयजकार केला
शेवटी अनिल काका गाढवे पाटील यांनी वेळात वेळ काढून औताडे साहेब आपल्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद देऊन सर्वांचे आभार मानले आभार मानले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा