राहाता येथे शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सत्कार
राहाता
लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234D2 व लायन्स क्लब ऑफ राहाता यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी शिक्षक, प्राध्यापक व सेवानिवृत्त शिक्षक अशा 50 ते 60 मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. श्री. माणिकराव आहेर, प्रांत अधिकारी शिर्डी यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून श्री. हेमंत पाटील (निवासी नायब तहसीलदार), श्रीमती संगीता गिरी (API, राहाता पोलिस स्टेशन), मा. श्री. राजेश पावसे (शिक्षण अधिकारी, राहाता) उपस्थित होते.
सर्वप्रथम झोनल चेअरमन डॉ. संजय उबाळे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर झालेल्या शिक्षक सत्कारानंतर श्री. मते सर, रूपाली नाईक मॅडम व इतर शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. पाहुण्यांनीही शिक्षक दिनानिमित्त मनोगत मांडत लायन्स क्लबच्या कार्याचे कौतुक केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री. माणिकराव आहेर यांनी शिक्षकांना शुभेच्छा देत लायन्स क्लब राहाता करत असलेल्या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक केले. "आगामी काळातही लायन्स क्लबने आमंत्रण दिल्यास मी नक्की उपस्थित राहीन," असे त्यांनी सांगितले.
डॉ. संजय उबाळे यांनी प्रमुख पाहुण्यांना डिस्ट्रिक्ट पिन प्रदान करून लायन्स क्लबमध्ये सामील होण्याचे आमंत्रण दिले. "आम्ही नेहमीच सोबत राहू," असे प्रांत अधिकारी यांनी सांगितले.
कार्यक्रमासाठी संत सावता महाराज मंदिर ट्रस्ट मंगल कार्यालय अध्यक्ष श्री. मच्छिंद्र बनकर व वीरभद्र मंदिर ट्रस्ट अध्यक्ष श्री. साहेबराव निधाने यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लायन्स क्लबचे अध्यक्ष ॲड. संतोष घोडके, सेक्रेटरी रतन चौधरी, माजी अध्यक्ष प्रकाश सदाफळ, ट्रेझरर दिनेश कारले, PRO ॲड. गोरखभाऊ दंडवते, मेंबरशिप चेअरमन अंजली उबाळे, डायरेक्टर दशरथ तुपे, पत्रकार किरण वाबळे व राजुभाई पठाण, स्वच्छता दूत भानुदास गाडेकर, कॉर्डिनेटर व्यंकटेश अहिरे, डायरेक्टर उमेश शेटे, डॉ. शर्वरी कुलकर्णी, श्वेता कार्ले, स्मिता मुरादे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण मोकळ यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. शर्वरी कुलकर्णी यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा