रविवार, ७ सप्टेंबर, २०२५

तुझ्या वाचून कोणी नाही रे” गणेश भक्तीगीताचे भव्य लोकार्पण

तुझ्या वाचून कोणी नाही रे” गणेश भक्तीगीताचे भव्य लोकार्पण



गणेश भक्तीच्या सुवासाने भरलेले “तुझ्या वाचून कोणी नाही रे” हे नवे भक्तीगीत नुकतेच श्रोत्यांच्या भेटीला आले आहे. या गीताचे शूटिंग भव्य दिमाखात पार पडले असून, आता ते NP VISION FILMS या युट्युब चैनलखाली रिलीज करण्यात आले आहे.

या भक्तीगीताचे दिग्दर्शन प्रमोद पंडीत यांनी केले असून, निर्मितीची जबाबदारी आबा निर्मळ यांनी पार पाडली आहे. नवनवीन संगीत, आकर्षक दृश्यमानता आणि भावपूर्ण शब्द यातून बाप्पाच्या भक्तीचा अनोखा अनुभव रसिकांना मिळतो आहे.

गणपती बाप्पाच्या भक्तीचा जयघोष घरोघरी होत असताना आलेले हे नवे गीत श्रोत्यांच्या मनाला भावत आहे. गीताचे शब्द, संगीत आणि सादरीकरण यातून बाप्पाप्रती असलेली भक्ती व श्रद्धा सुंदररीत्या व्यक्त झाली आहे.


या गीताच्या प्रकाशनावेळी पत्रकार ज्ञानेश्वर साबळे व उपस्थित मान्यवरांनी टीमचे मन:पूर्वक अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
                R . शिर्डी न्यूज 
          (  लोणी) ज्ञानेश्वर साबळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

महिला सामाजिक कार्यकर्ती व साहित्यिकांचा होणार विशेष गौरवशब्दगंध च्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

महिला सामाजिक कार्यकर्ती व साहित्यिकांचा होणार विशेष गौरव शब्दगंध च्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय अहिल्यानगर  शब्दगंध साहित्यिक ...