रविवार, १४ सप्टेंबर, २०२५

दहिफळे, खेमनर शिक्षकांनी शाळा म्हणजे आपलं कुटुंब मानलं त्यांच कार्य सदैव प्रेरणादायी- जंगले पानेगाव शाळेतील दोन शिक्षकांना निरोप दोघांचे स्वागत

दहिफळे, खेमनर शिक्षकांनी शाळा म्हणजे आपलं कुटुंब मानलं त्यांच कार्य सदैव प्रेरणादायी- जंगले 

पुन्हा पानेगांवच्या शाळेत या  
पानेगाव शाळेतील दोन शिक्षकांना निरोप दोघांचे स्वागत


पानेगाव 
 नेवासा तालुक्यातील पानेगांव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षकांना निरोप स्वागत समारंभ पार पडला यावेळी जंगले यांनी ज्ञानदानाचे कार्य प्रामाणिक
आणि निष्ठेने करणाऱ्या शिक्षकांचे काम सदैव प्रेरणादायी असून, भावी सक्षम पिढी घडवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या शिक्षकांना निरोप देताना मन भावुक होत असल्याचे प्रतिपादन माजी सरपंच संजय जंगले यांनी केले.
पानेगाव (ता. नेवासा) येथील जिल्हा परिषद शाळेतून बदली झालेले विष्णू दहिफळे,मच्छिंद्र खेमनर यांना निरोप 
तर नव्याने रुजू झालेल्या रमेश काकडे शिक्षिका विजया दाणी यांचे स्वागत करण्यात आले. त्यानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पानेगांव  शनिवारी आयोजित समारंभात जंगले बोलत होते. अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अश्विनी गुडधे. व्यासपीठावर लोकनियुक्त सरपंच निकीता भोसले/आंबेकर, उपसरपंच सुरेश जंगले, शाळेसाठी नेहमी योगदान देणारे सतिश जंगले,मुळाचे संचालक रंगनाथ जंगले,माजी सरपंच हौशाबापू जंगले माजी उपसरपंच डॉ जयवंतराव गुडधे माजी उपसरपंच दत्तात्रय घोलप  आदी उपस्थित होते.



शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी दिलेले योगदान आणि विद्यार्थ्यांच्या
ज्ञानवाढीसाठी केलेली वातावरणनिर्मिती कायम स्मरणात राहील. नव्याने आलेल्या शिक्षकांनीदेखील बदली झालेल्या शिक्षकांसारखे ज्ञानदानाचे कार्य करावे. बदली झालेल्या शिक्षकांनी पुढील काळात पुन्हा याच शाळेवर रुजू झाल्यास गावाला निश्चित आनंद होईल, अशी माजी उपसरपंच डॉ जयवंतराव गुडधे यांनी बोलून दाखवले. यावेळी सुभाषराव गुडधे, राजेंद्र जंगले,दिपक जंगले बाबासाहेब गुडधे, दत्तात्रय चिंधे पांडुरंग जंगले विजय जंगले, पोपटराव जंगले, शिक्षक अरुण ढेरे,शिक्षिका छाया देठे, अंगणवाडी सेविका मंगल गुडधे, गौरी गायकवाड, पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
प्रस्ताविक अरुण ढेरे यांनी केले सुत्रसंचलन सुभाष गुडधे, आभार संकेत गुडधे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

महिला सामाजिक कार्यकर्ती व साहित्यिकांचा होणार विशेष गौरवशब्दगंध च्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

महिला सामाजिक कार्यकर्ती व साहित्यिकांचा होणार विशेष गौरव शब्दगंध च्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय अहिल्यानगर  शब्दगंध साहित्यिक ...