"अण्णाभाऊंच्या विचारांना उजाळा – सौ.प्रभावती घोगरे यांच्याकडून कोल्हार व लोणी येथे जयंतीनिमित्त अभिवादन"
राहाता
संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील बुलंद आवाज, वंचितांचे प्रतिनिधी, लोकनाट्याचे सशक्त माध्यम आणि क्रांतीचे प्रेरणास्थान असलेले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लोणी खुर्द व कोल्हार बुद्रुक येथे अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस सौ.प्रभावती जनार्दन घोगरे यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला एक वेगळी ऊर्जा मिळाली.
या प्रसंगी सौ.प्रभावती घोगरे म्हणाल्या,अण्णाभाऊ साठे हे फक्त कवी किंवा लेखक नव्हते, तर ते वंचित, श्रमिक, आणि शोषित समाजाचा जिवंत आवाज होते. त्यांनी अन्यायाविरुद्ध संघर्ष करत समाजाला जागवण्याचे काम केले. आजही त्यांचे विचार आम्हाला सामाजिक कार्यासाठी बळ देतात.
लोणी खुर्द कार्यक्रमाचे आयोजन युवक मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. प्रमुख उपस्थितीमध्ये भास्करराव आहेर (चेअरमन, विविध कार्यकारी सहकारी सोसायटी)अमोल घोगरे, किरण घोगरे, दिलीपराव घोगरे, सचिन उर्फ मुन्ना आहेर, शामराव घोगरे, विकी राक्षे, सागर राक्षे, बाळासाहेब लोखंडे, दिपक घोगरे, सुहास आहेर, प्रसाद घोगरे, गणेश जगधने, तसेच श्रीमती.सुनीताताई कोरडे (ग्रामपंचायत सदस्या) सौ.हिनाताई उबाळे, कौशल्याताई राक्षे यांच्यासह अनेक महिलांनीही कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला.
कोल्हार बुद्रुक येथे झालेल्या कार्यक्रमात शिवकुमार जंगम यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले.
अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याची आठवण करून देणारे भाषण, अभिवादन आणि जनजागृतीपर संवाद यामुळे कार्यक्रम उत्स्फूर्ततेने भरलेला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा