सोमवार, १४ एप्रिल, २०२५

विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकरांची १३४ वी जयंती साजरी

 विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकरांची १३४ वी जयंती साजरी 




  सालाबाद प्रमाणे राहाता शहरांमध्ये विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकरांची १३४ वी जयंती साजरी करण्यात आली . विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा औचित्य साधून आय एस डी पी योजनेअंतर्गत  राहाता शहरात आंबेडकरनगर मध्ये राबवलेल्या घरकुल योजनाच्या उर्वरित  ४८ घरकुलाचे काम पूर्ण करण्याचा शुभारंभ माजी खासदार डॉ . सुजय दादा विखे पाटील यांच्या शुभहस्ते झाला .  श्री . छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल प्राणांगणात जयंती उत्सवाचे आयोजन योजन करण्यात आले होते . विश्वरत्न डॉ . आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन माजी खासदार डॉ . सुजयदादा विखे पाटील व राहाता शहरातील प्रमुख ग्रामस्थ यांच्या हस्ते डॉ . बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . भिक्खू आणि  संघ यांनी त्रिशरण पंचशील दिले . त्यानंतर डॉ . आंबेडकरांच्या जीवनावर मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली . 
       त्यामध्ये माजी खासदार डॉ . सुजय दादा विखे पाटील , 
 गणेश कारखान्याचे माजी चेअरमन मुकुंदराव सदाफळ , राहाता नगरपरिषदेचे मुख्याधिकारी लोंढे साहेब , ॲड. रघुनाथ बोठे ,  माजी चेअरमन ॲड . नारायणराव कार्ले , मोहनराव सदाफळ ,  माजी नगराध्यक्ष कैलासराव सदाफळ ,   रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय सहाय्यक अधिकारी प्रमोद तोरणे , शारदा विद्या मंदिराचे प्राचार्य बनसोडे सर , साई योगा ग्रुपचे डॉ . पानगव्हाणे  ,धनंजय गाडेकर, मनसेचे विजयराव भोगले , सर्जेराव मते , माजी सैनिक भानुदास गाडेकर , डॉ . संजय उबाळे , माजी नगरसेवक भिमराज निकाळे , बजरंग दलाचे शुभम मुर्तडक , ॲड . अक्षय निकाळे  कु . प्रगती चोखर , सौ . गायकवाड मॅडम , विनायक आरणे. शिवाभाऊ वाबळे . अरुण मोकळ सर .कु. अविरा पवार . 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा . राजेंद्र निकाळे यांनी केले
       यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भाऊसाहेब जेजुरकर , माजी नगराध्यक्ष सोपान काका सदाफळ ,माजी चेअरमन सुरेशराव गाडेकर , ॲड . गोरक्ष दंडवते , गणेश कारखान्याचे संचालक भगवानराव टिळेकर ,  आर . पी . आय .चे ज्येष्ठ नेते रावसाहेब बनसोडे , आर. पी .आय जिल्हाध्यक्ष प्रदीप ( पप्पू भाऊ ) बनसोडे , संजय सदाफळ , माजी नगराध्यक्षा संगीताताई निकाळे ,  आर .पी.आय तालुका अध्यक्ष धनंजय निकाळे , जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष कैलास उर्फ गणेश निकाळे , आर पी आय शहराध्यक्ष राजेंद्र पाळंदे , पोपटराव कोल्हे ,  कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजू धुमसे आणि दिलीपराव गाडेकर , समता परिषदेचे राहता शहराध्यक्ष संतोष लोंढे , डॉ . गायकवाड , डॉ . संतोष मोकळ , वसंतराव खरात , जयंतराव घोडेराव , पंकज पिपाडा , दशरथ तुपे , पांडुरंग तुपे, राजेंद्र कार्ले , राजेंद्र बावके , बाळासाहेब कोळगे , पेंटर विलास पाळंदे , पोपटराव शिरसाठ , रमेश गजानन निकाळे , माजी नगरसेवक सुरेश निकाळे , सुधाकर रंगनाथ निकाळे , शशिकांत कांबळे , दिनकर निकाळे , उत्तमराव कोळगे , रमेश निकाळे सर , सागर भालेराव , जालिंदर आरणे , अण्णासाहेब पाळंदे,  कानिफनाथ बिडवे , ॲड. राजेंद्र पाळंदे व आंबेडकर प्रेमी समुदाय , रिपब्लिकन पक्ष  , राष्ट्रीय सेवक संघ , बजरंग दल , महात्मा फुले समता परिषद  इत्यादींचे कार्यकर्ते  मोठ्या संख्येने उपस्थित होते .
       सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी नगरसेवक भिमराज निकाळे , आबासाहेब बन्सी निकाळे , ज्ञानेश्वर निकाळे, संदीप रामभाऊ सोनवणे ,साई पाळंदे, राहुल नानासाहेब निकाळे , रवींद्र कोळगे , ओम निकाळे , रमाकांत निकाळे , विकास निकाळे , स्वराज निकाळे ,  अभिजीत निकाळे , निलेश गाडेकर , सिद्धार्थ अशोक निकाळे , शशिकांत जगताप , विकास निकाळे , अतुल निकाळे यांनी विशेष परिश्रम घेतले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...