परमपूज्य,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्ताने अस्तगाव येथे भव्य दिव्य असे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
विश्वरत्न,महामानव,बोधिसत्व, परमपूज्य,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्ताने अस्तगाव येथे भव्य दिव्य असे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रसंगी नगर दक्षिणचे लोकप्रिय माजी खासदार,युवा नेते मा.श्री.सुजय दादा विखे पाटील यांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले...
यावेळी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान,अस्तगाव व समता फाउंडेशन यांच्या विद्यमाने आयोजित मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते त्याचे उद्घाटन माजी खासदार सुजय दादा विखे पा.यांच्या हस्ते करण्यात आले,यावेळी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष जॉन युवराज त्रिभुवन,अस्तगावचे पोलीस पाटील श्री.राजेश त्रिभुवन,माजी सभापती श्रीनिवास त्रिभुवन, आरपीआयचे शहराध्यक्ष महेश त्रिभुवन,गौरव त्रिभुवन,अनिल त्रिभुवन यांनी प्रतिमा पूजन करून मा.खासदार युवा नेते सुजय दादा विखे पाटील यांचा मंडळातर्फे सत्कार केला...
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांना जेसीबी द्वारे युवानेते सुजय दादा विखे पाटील यांच्या हस्ते पुष्पवृष्टी व फुलांचा हार घालून करण्यात आली,त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांचा डान्स व वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती,युवानेते सुजय दादा विखे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.,यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश सरचिटणीस दशरथ गव्हाणे यांनी ट्रॉफी व मेडल सौजन्य दिले,यावेळी एक नंबर सोसायटीचे चेअरमन विजयराव गोर्डे पाटील,भाजपा ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस नंदू भाऊ जेजुरकर, अस्तगावचे सरपंच सुनील चोळके,विखे पाटील कारखान्याचे संचालक नंदू भाऊ गव्हाणे,दोन नंबर सोसायटीचे चेअरमन ज्ञानदेव चोळके,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोषराव गोर्डे,वाल्मीक अण्णा गोर्डे,आर.बी.चोळके, केशव चोळके,नवनाथ नळे,गणेशचे संचालक महेंद्र गोर्डे,काँग्रेस तालुकाध्यक्ष पंकज लोंढे, बशीर भाई शेख,रवी जेजुरकर,ज्ञानेश्वर जेजुरकर,आवि जेजुरकर,पवन आरंगळे,उपसरपंच नाना अष्टेकर,हेमंत गोर्डे,रंजन त्रिभुवन,दिलीप त्रिभुवन,विजय मोकळ, कमलेश त्रिभुवन,विजय त्रिभुवन, सुमित्र कुमार त्रिभुवन,प्रमोद त्रिभुवन,पप्पू खरात,अशोक पेटारे,कैलास गायकवाड,संजय चोळके,दादासाहेब गवांदे,विपुल गवांदे, इल्लू भाई तांबोळी, अनिल देसाई,विजय अंभोरे,अशोकराव नळे पाटील, मेजर रंजन सुलाखे,राजू त्रिभुवन,लांडे पाटील,वाल्मीक बिडवे, सतीश आत्रे, पप्पू शेख,समदशेख,जाकीर शेख,हारुण शेख,राहुल शेजुळ, रोहित त्रिभुवन,सुमित त्रिभुवन, प्रकल्प त्रिभुवन,बाळू नळे,आदिल शेख, प्रकल्प त्रिभुवन,सागर पेटारे, सचिन त्रिभुवन,ऋतिक त्रिभुवन, राकेश त्रिभुवन,यश त्रिभुवन, आकाश त्रिभुवन,संभाजी मेढे, देविदास जेजुरकर,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे कर्डिले सर,पंडित मॅडम,दातीर मॅडम,विनोद त्रिभुवन,रमेश त्रिभुवन,सुंदर त्रिभुवन,ज्ञानेश्वर त्रिभुवन,विलास त्रिभुवन पावलस,त्रिभुवन,सुनील त्रिभुवन,चेतन चोळके,किरण त्रिभुवन,सतीश बावके,राहुल वाघमारे,सागर वाघमारे आदिसह मोठ्या प्रमाणात महिला भगिनी उपस्थित होत्या,सुनिता त्रिभुवन, अलका त्रिभुवन,उषा त्रिभुवन, ताराबाई त्रिभुवन,सिंधुबाई त्रिभुवन,अर्चना त्रिभुवन,इंदुबाई मोकळ,प्रज्ञा त्रिभुवन,अण्णा त्रिभुवन, सुखदेव त्रिभुवन,भिकाजी त्रिभुवन,रवी लोंढे आदीसह मोठ्या प्रमाणात अस्तगावकर ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान,अस्तगावचे अध्यक्ष जॉन युवराज यांनी स्वागत व सत्कार केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी व सदस्य यांचे अनमोल असे सहकार्य लाभले,सूत्रसंचालन प्रतिष्ठानचे अध्यक्ष जॉन युवराज त्रिभुवन यांनी केले,शाळेतील विद्यार्थ्यांना व उपस्थित सर्व गावकऱ्यांना अस्तगावचे पोलीस पाटील राजेश त्रिभुवन व विजय त्रिभुवन यांनी नाष्ट्याची व्यवस्था केली,सदर प्रसंगी शिर्डी मतदार संघाचे भाग्यविधाते मा. श्री सुजय दादा विखे पाटील यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक नियोजित जागा यासाठी शुशोभीकरणासाठी भरीव अशी निधी दिली व पुढील कामासाठी मोठा निधी देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,अस्तगाव येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते, बालगोपाळांनाही सुजय दादा विखे पाटील यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही,दिलदार मनाचे दादा यांनी बालगोपाळांची इच्छा पूर्ण करत त्यांच्याबरोबर सेल्फी काढून त्यांना भरभरून असा प्रतिसाद दिला,यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान हे नेहमीच असे चांगले सामाजिक उपक्रम राबवत असतात,त्याबद्दल अस्तगावकरांनी व युवानेते सुजय दादा विखे पाटील यांनी मंडळाचे व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा