नवदाम्पत्याची वृक्षारोपण करून वैवाहिक जीवनाची सुरुवात.....
राहाता येथिल प्रगतिशील शेतकरी म्हासुपाटील सदाफळ यांचे नविन उद्योजक चिरंजीव सुदर्शन याचे दि.१२ मार्चला लग्न झाले.आपल्या वैवाहिक जीवनाची सुरुवात एक वेगळ्या संस्मरणीय सामाजिक उपक्रम राबवून करण्याचा संकल्प सुदर्शन सदाफळ यांनी आपले मामा साईयोग फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ बापूसाहेब पानगव्हाणे यांच्या कडे बोलून दाखविला.लगेचच फाउंडेशन द्वारे रविवारी सकाळी ७ वाजता १५ चारी राहाता येथे निवासस्थानी सुदर्शन व सौ रुपाली या नवदाम्पत्याच्या हस्ते १० फुटी केशर आंब्याचे रोपण करण्यात आले.निसर्ग संवर्धनासाठी वृक्षारोपण हाच पर्याय असून त्यासाठी फाउंडेशन द्वारे महापुरुष व फाउंडेशनच्या सदस्यांचे वाढदिवस शक्य तेव्हा वृक्षारोपण करून साजरे करण्यात येतात.तसेच दशक्रिया विधीला वृक्षारोपण रुपी श्रद्धांजली वाहून स्मृती जपण्याचे कार्य सुरू केले आहे.
याप्रसंगी जेष्ठ सदस्य सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे यांनी सर्वांचे स्वागत करून फाउंडेशनच्या सामाजिक कार्याची माहिती देत प्रस्तावना केली.रयत शिक्षण संस्थेचे निवृत प्राध्यापक विलास सदाफळ व माजी उपाध्यक्ष संजय सदाफळ यांनी या अनोख्या उपक्रमाचे कौतुक करत फाउंडेशनच्या अविरत चालू असलेल्या सामाजिक कार्याचा गौरव केला.शेवटी सुदर्शन सदाफळ यांनी वृक्षारोपणाचे महत्व विशद करत हा संस्मरणीय क्षण कधीच विसरू शकणार नाही असे म्हणत सर्वांचे आभार मानले.
यावेळी साईयोग फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ बापूसाहेब पानगव्हाणे,म्हसुपाटील सदाफळ,संजय सदाफळ,विलास सदाफळ,संदीप सातपुते,राजेंद्र बोराडे,ॲड गोरख दंडवते,बाळासाहेब गाडेकर,भरत दवंगे,संदीप डांगे,मनोज पिपाडा,रंगनाथ सदाफळ,दीपक दंडवते,संजय वाघमारे,उमेश लुटे,शिवाजी पोटे,व्यंकटेश अहिरे,विठ्ठल निर्मळ,सुभाष दंडवते,ज्ञानेश्वर आरणे,पुष्पा म्हसु सदाफळ,श्वेता संदीप सातपुते,गणेश सदाफळ,चिन्मय सदाफळ,शौर्य सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा