शनिवार, १५ मार्च, २०२५

डी.एम.चौधरीना समाजरत्न पुरस्कार जाहीर.

डी.एम.चौधरीना समाजरत्न पुरस्कार जाहीर.                                            


राहाता 
राहता येथील श्री बिरोबा महाराज चॅरिटेबल ट्रस्टने या वर्षी सन 2025 मधील समाजरत्न पुरस्कारासाठी गोगलगांव येथील डि.एम चौधरी यांची निवड केलेचे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.राहाता शहराचे उपनगर 15 चारी येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराज मंदिर येथे सालाबाद प्रमाणे रविवार दि.16 मार्च 2025 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेेत ह.भ.प.विकास महाराज गायकवाड यांची संंत तुकाराम महाराज बिज महोत्सव किर्तन सेवा आयोजित करण्यात आले आहे.तसेच गरीबी शिक्षणाचे आड येवू शकत नाही.असा दृढ विश्वास निर्माण करणारे डी.एम.चौधरी यांनी समाजाची मदत घेऊन त्याकाळी शिक्षण पुर्ण करत मोठया समस्यांना सामोरे जात परखड परीश्रम घेतले.बँकीग सेवेत वरिष्ठ अधिकारी पदावर काम करीत असतांना ग्रामीण भागातील शेतकरीवर्ग, हातावर काम करणारे मजदुर छोटे मोठे व्यापारी यांच्या सोयींसाठी अनेक खेड्यात, शहरी भागात विशेष लक्ष घालून बँक ऑफ बडोदा ,गौतम बँक शाखा निर्माण करून गावोगाव शेतकरी गट स्थापन करून विविध योजनांवर भर देत सेवा देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. डी.एम.चौधरी यांनी युवकांना आदर्श घालून दिले असुन त्यांचे मार्गदर्शन युवकांनी घ्यावे. शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने साहेब, पोलीस निरीक्षक  नितीन चव्हाण यांचे हस्ते डी.एम.चौधरीना समाजरत्न पुुरस्कार देवुन सन्मान करण्यात येणार आहे.यावेळी बालकन्या कु.संस्कृती सदाफळ हिचे जगद्गुरू संत तुकाराम महाराज जिवनपटावर माहीती सादर करणार आहे.तदनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहीती विधितज्ञ, श्री बिरोबा ट्रस्ट अध्यक्ष रामनाथ सदाफळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

माझ्या कार्यात मुळाथडी परीसराचं मोठं योगदान:-खासदार वाकचौरे

माझ्या कार्यात मुळाथडी परीसराचं मोठं योगदान:-खासदार वाकचौरे मुळाथडीच्या गावांना भरघोस निधी देणार  पानेगांव   नेवासे तसेच राहुरी ...