यापुढेही सर्वसामान्य,शेतकरी,कष्टकरी,कामगार यांच्या प्रश्नासाठी असेच अहोरात्र झटत राहु अशी ग्वाही यानिमित्ताने आपल्या सर्वांच्या साक्षीने देतो असे मनोगत भाजपा नेते डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी आपल्या अभिष्टचिंतन प्रसंगी बोलताना व्यक्त केले. महाराष्ट्राची संस्कृती असणारा वारकरी सांप्रदयाचा वसा जपत भाजपा नेते डॉ.राजेंद्र पिपाडा यांचा अभीष्टचिंतन सोहळा वारकरी व भजनी मंडळ व जेष्ठांच्या वतीने साजरा झाला. याप्रसंगी राहता प्रेस क्लबचे अध्यक्ष रामकृष्ण लोंढे, आरपीआयचे दिलीपराव वाघमारे, प्रगतशील शेतकरी शिवाजीराव आनाप, धडाडीचे कार्यकर्ते पोपटराव वर्पे, जैन श्रावक संघाचे अध्यक्ष अनिल पिपाडा, मदनलालजी पिपाडा महावीर पिपाडा, राजेश भन्साळी ,संजय पिपाडा, कमलनयन टाकी, वीरेश रुणवाल, कमलेश धाडीवाल, नेमीचंद लोढा, सुनील धाडीवाल, सुमतीलाल ताथेड, अजित शेठ धाडीवाल, नरेंद्र पिपाडा ,अभय पिपाडा महेंद्र पिपाडा प्रफुल पिपाडा, बाबू शेठ रायसोनी उपस्थित होते.
यावेळी राहाता येथील सुप्रसिद्ध मिसळ पॉईंट हॉटेल राधिका येथे वाढदिवसाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी फटाक्याच्या आतषबाजीत डॉ.राजेंद्र पिपाडा यांचे स्वागत केले. प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.ममता पिपाडा यांनी डॉ.राजेंद्र पिपाडा यांचे औक्षण केले.फेटा बांधण्यात आला त्यानंतर श्री.साईबाबांची आरती करत उपस्थितांनी डॉ पिपाडा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर वारकरी संप्रदायातील बांधवांनी पसायदान म्हणत वातावरण भक्तीमय बनविले. एक आगळा वेळा अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. यावेळी बोलताना डॉ.पिपाडा म्हणाले की आम्ही आमचे आयुष्य पुर्णपणे सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकरी,कामगार यांच्या प्रश्नासाठी संघर्ष कऱण्यासाठी झोकुन दिले आहे. माझा जन्म शेतकरी कुटुंबात झाला असल्यामुळे शेतक-यांची पिडा व दुख हे जवळुन पाहिलेले आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा त्यांच्यावर अन्यायची परिस्थीती येईल तेव्हा तेंव्हा आम्ही खंबीर उभे राहु. शिर्डी संस्थानचे कामगार असो किंवा गोरगरिबांचे प्रश्न असो आम्ही सदैव प्रामाणिकपणे त्यांच्यासोबत राहिलो व यापुढेही राहणार. अशा शब्दात डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
यावेळी आरपीआयचे दिलीपराव वाघमारे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की कधीही कोणतेही काम करताना डॉ.पिपाडा हे पुर्णपणे मनापासुन करतात व त्यांच्या एवढा कामाचा पाठपुरावा करणारा नेता मी कधी पाहिला नाही. गोरगरिबांविषयी तळमळ असणारा नेता म्हणजे डॉ.राजेंद्र पिपाडा हे आहेत. यावेळी राहाता प्रेस क्लबचे अध्यक्ष रामकृष्णजी लोंढे,अंध अपंग संघटनेचे सतिष निकम,वंदना पिपाडा,श्रृती पिपाडा,हभप निकाळे, ब्रम्हानंद वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक हभप संतोष महाराज दिक्षित, नवनाथ थोरे आदींनी आपले मनोगत व्यक्त करुन डॉ.पिपाडांना शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा