मंगळवार, ७ जानेवारी, २०२५

पोलिस स्थापना दिनानिमित्त स्वच्छता व वृक्षारोपण अभियान ....

 पोलिस स्थापना दिनानिमित्त स्वच्छता व वृक्षारोपण अभियान ....



राहाता येथील साईयोग फाउंडेशन व राहाता पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिस स्थापना दिनानिमित्त रविवारी सकाळी स्वच्छता व वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले.राहाता पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रणजीत गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशन परिसर झाडून स्वच्छ करण्यात आला.स्वतः पी.आय.रणजीत गलांडे यांनी हातात झाडू घेवून अभियानात सहभाग नोंदवीला तसेच साईयोग फाउंडेशनच्या प्रथेप्रमाणे त्यांच्या हस्ते नगर मनमाड रोडला १२ फुटी रेनट्री वृक्षाचे रोपण करून त्याचे स्वागत करण्यात आले.पदभार स्वीकारल्यानंतर अल्पावधीतच रणजित गलांडे यांनी राहाता शहर व परिसरतील चोऱ्या व अवैध धंद्यावर आळा बसवला.तसेच पोलिस स्टेशनमध्ये येणाऱ्या पीडितांची आपुलकीने चौकशी करून न्याय देण्याचा प्रयत्न करत असल्याने त्यांनी एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून जेष्ठ पत्रकार बाळासाहेब सोनवणे यांच्या हस्ते  फेटा बांधून साई शाल देवून हृद्य सत्कार करण्यात आला.

साईयोग फाऊंडेशनचे जेष्ठ सदस्य बाळासाहेब गाडेकर यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.सत्काराला उत्तर देताना पी.आय.गलांडे म्हणाले की जनसामान्यांना न्याय देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो.तसेच राहाता परिसरात अवैध धंदे बंद करून भयमुक्त वातावरण करण्याचा प्रयत्न करणार आहे.गोपनीय पोलिस कर्मचारी नाईक विनोद गंभीरे यांनी पोलिस स्टेशन परिसरात स्वच्छता व वृक्षारोपण अभियान राबविल्याबद्दल साईयोग फाऊंडेशनचे आभार मानले.

शेवटी सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे यांनी पी.आय.गलांडे यांच्या कार्य कौशल्याचा गौरव करून सर्वांचे आभार मानले.

याप्रसंगी जेष्ठ पत्रकार बाळासाहेब सोनवणे,साईयोग फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ बापूसाहेब पानगव्हाणे,पोलिस हेड कॉन्स्टेबल मच्छिंद्र शिरसाठ,पोलिस कॉन्स्टेबल संभाजी शिंदे,भाऊसाहेब बनकर,मनोज पिपाडा,संजय बाबर,ॲड गोरख दंडवते,बबलू फटांगरे,विष्णू गाडेकर,विठ्ठल निर्मळ,ज्ञानेश्वर आरणे,दिपक दंडवते,अनिल सातव,उमेश लुटे,बाळासाहेब तारगे,शिवाजी पोटे,अंकुश गांधी आदी मान्यवर उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...