एकरुखे :-
गॅस गळती होऊन घडलेल्या अग्नीतांडवातील भाजलेला सुरेश भाऊसाहेब वायकर या तरुणाचा आज दि ५ ऑगस्ट रोजी अखेर मृत्यु झाला.या घटनेने एकरुखे गावातील वायकर वस्तीवर शोककळा पसरली आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की,
राहाता तालुक्यातील एकरुखे गाव हद्दीतील गणेशनगर येथील वायकर वस्तीवर दि २३ ऑगस्ट रोजी घरगुती वापरातील गॅस टाकीतील गॅस गळती होऊन उडालेल्या अग्नीच्या भडक्यात वायकर कुंटुबातील व शेजारील विप्रदास कुंटुबातील नऊ सदस्य भाजले गेले होते.यात वायकर कुंटुबातील सुरेश भाऊसाहेब वायकर व विमल सुरेश वायकर हे पतीपत्नी गंभीर रित्या भाजले गेले होते . घटनेतील भाजलेले नऊ रुग्णावर प्रवरा ग्रामीण रुग्णालय येथे उपचार सुरु होते. मात्र उपचार सुरु असतानाच आज ५ सप्टेंबर रोजी पहाटेच्या वेळी सुरेश भाऊसाहेब वायकर यानी जगाचा निरोप घेतला.चौदा दिवस मृत्यूशी झुंज देत आज या तरुणाचा मृत्यु ची वार्ता कळताच गणेशनगर परिसरात शोककळा पसरली .या तरुणाच्या पश्चात पत्नी एक मुलगा तीन मुली आई वडील दोन भाऊ असा मोठा परिवार आहे.वायकर कुंटुबातील कर्ता पुरुषाचा या दुर्घटनेत मृत्यु झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. मृत्यु पावलेल्या तरुणाची घरची परिस्थीती अत्यंत बिकट असून मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत आपले कुंटुब चालवत होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा