रविवार, ८ सप्टेंबर, २०२४

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शाखा शिर्डी केंद्राच्या वतीने आयोजन

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शाखा शिर्डी केंद्राच्या वतीने आयोजन

शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन )

प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शाखा शिर्डी केंद्राच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ग्रामविकास प्रभाग राष्ट्रीय संयोजिका व पुणे मिरा सोसायटी सबझोनच्या मुख्य प्रशासिका आदरणीय सुनंदा दीदी जी व तसेच नारायणगाव हून आलेले वरिष्ठ राजयोग शिक्षक ब्रह्माकुमार राजयोगी दशरथ भाईजी मुख्य वक्त व अतिथीच्या रूपाने लाभले. याप्रसंगी सुनंदादीदींनी गणपतीचे अध्यात्मिक रहस्य समजावून सांगितले व सुखी जीवनाचे रहस्य स्पष्ट केले . ब्रह्मकुमार दशरथ भाई यांनी आध्यात्मिक ज्ञानाचे प्रबोधन करून नवनिर्माण होत असलेल्या भवनांच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश भाऊ गोंदकर तसेच प्रमोद भाऊ गोंदकर व अमृत भाई जगताप इत्यादींचा सत्कार व सन्मान करण्यात आला. याप्रसंगी खास ब्रह्माकुमारी भारतीदीदीजी संगमनेर सेवा केंद्राच्या मुख्य संचालिका उपस्थित होत्या. तसेच  शिर्डी सेवा केंद्राच्या मुख्य संचालिका ब्रह्माकुमारी पद्मा बहन यांनी सर्वांना शांत व सुखी जीवनासाठी राजयोग मेडिटेशन शिबिरासाठी येण्याचे आवाहन केले. ब्रह्माकुमारी डॉ.योगिनी बहन यांनी सूत्रसंचालन केले.या कार्यक्रमासाठी संपूर्ण ईश्वरीय परिवाराच्या सदस्यांनी सहकार्य केले व मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

शिर्डीत आयुर्वेद महाशिबिर यशस्वी

शिर्डीत आयुर्वेद महाशिबिर यशस्वी शिर्डी :  श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था यांच्या वतीने श्री साईनाथ रुग्णालय येथे दि. 21...