वाकडी मध्ये संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी..
राहता=
सालाबाद प्रमाणे सावता महाराज पुण्यतिथी वाकडी या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या प्रसंगी महंत रामगिरिजी महाराज (श्री क्षेत्र साराला बेट,गोदावरी धाम )यांचे सुश्राव्य कीर्तन पार पडले. कीर्तन सेवेसाठी महाराजांनी भगवंताच्या प्राप्ती साठी काय प्रयत्न करावेत आणि भगवंताची कृपादृष्टी झाल्यावर मनुष्य जीवाचा कसा उद्धार होतो याचे अतिशय मंत्रमुग्ध करणारे निरूपण त्या वेळी केले.
कीर्तन सेवेसाठी महाराजांनी साठविला हरी जी ही हृदय मंदिरी | त्याची सरली येरझार | झाला सुलभ व्यापार || या तुकोबारायांच्या व्यापक अभंगातून केले. व संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पांडुरंगाच्या भक्तीतून प्रपंच्या सोबत व बजरंग बली हनुमान, सोनी, हिरे यांचाही उदाहरण देताना भक्ती मार्ग कसा मिळू शकतो याचे उत्तम दाखले त्यावेळी दिले.वारकरी सांप्रदायाचे शिरोमणी सावता महाराज यांनी आपल्या जीवनात केलेला त्याग व भगवंताप्रती असलेली निष्ठा यातून खूप काही अनुकरण्या जोगे आहे. जो आपल्या हृदयात भगवंताला साठून ठेवतो . त्याच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहत नाही .असे या अभंगात वर्णन आहे.या कार्यक्रमापूर्वी पंचदिवासीय काकडा ,दैनंदिन हरिपाठ,श्री संत शिरोमणी सावता महाराज चरित्र पारायण पठण,विठ्ठल रुक्मिणी व सावता महाराज मूर्ती महाअभिषेक व प्रतिमा मिरवणूक त्यानंतर कीर्तन सेवा व महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला अश्या प्रकारे कार्यक्रमाची रूपरेषा होती.त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे उपस्थित होते .त्यामध्ये खासदार मा.श्री.सुजयदादा विखे पाटील, कोपरगाव मतदार संघ आमदार मा.आशुतोष दादा काळे व संजीवनी सहकारी साखर कारखाना चेअरमन मा.विवेक भैय्या कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते.महराजांसमवेत श्री.मधुकर महाराज,रामभाऊ महाराज नादिकर ,संतोष महाराज सोळुंके.
आदी मान्यवर उपस्थित होते. व त्याचबरोबर वाकडी समस्त ग्रामस्थ , पंचक्रोशी भजनी मंडळ व बाल भजनी मंडळ वाकडी, यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.त्या प्रसंगी श्री सावता महाराज मंदिर ट्रस्ट वाकडी खंडोबाची यांच्या वतीने सर्व उपस्थितांचे समस्त ग्रामस्थ वाकडी व पंचक्रोशीतील व मान्यवरांचे मंदिर परिसरात विविध कामे केले त्यांचे सहर्ष स्वागत व आभार मानण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा