*साईसेवा मतिमंद विद्यालयात सदिच्छा भेट
शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
आज दिनांक १ ऑगस्ट २०२४ रोजी साईसेवा निवासी मतिमंद मुला मुलींची शाळा शिर्डी येथे प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (विद्यापीठ) लोणी येथील डॉक्टर्स व विद्यार्थ्यांनी विद्यालयास भेट दिली.
युनिव्हर्सिटी ऑफ वर्सेस्टर, यूकेच्या विद्यार्थ्यांनी "भारतातील मतिमंद (दिव्यांग) मुलांसाठी प्रशिक्षण आणि शिक्षणाचा अभ्यास आणि निरीक्षण करण्यासाठी विद्यालयास भेट देऊन येथील मतिमंद (दिव्यांग) विद्यार्थ्यांना प्रशिक्षण कसे दिले जाते व विद्यालयात चालणारे उपक्रम याविषयी माहिती घेतली. मतिमंद (दिव्यांग) विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी तसेच त्या कशा सोडवाव्यात याविषयी माहिती घेतली. तसेच मतिमंद (दिव्यांग) विद्यार्थ्यांच्या दैनंदिन दिनचर्या विषयी माहिती घेतली.
सदर कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, शिक्षक व कर्मचारी हजर होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा