शनिवार, ३ ऑगस्ट, २०२४

व्ही.पी.एस चे विद्यार्थी रमले चित्रांच्या दुनियेत

व्ही.पी.एस चे विद्यार्थी रमले चित्रांच्या दुनियेत

शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)


विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये बँक ऑफ बडोदा शाखा लोणावळा 117 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित शालेय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना निसर्ग चित्रा ची थीम देण्यात आली होती. सहभागी स्पर्धकांनी अतिशय सुंदर विविध प्रकारची चित्रं रेखाटली. स्पर्धेसाठी एकूण 320 विद्यार्थी सहभागी झाले होते. सहभागी विद्यार्थ्यांपैकी पंधरा विद्यार्थ्यांची निवडक चित्रे निवडण्यात आली. विद्यार्थ्यांचे प्रशस्तीपत्रके आणि भेटवस्तू देऊन कौतुक करण्यात आले. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देऊन खाऊचे वाटप करण्यात आले.

स्पर्धेतील निवडलेल्या चित्रांपैकी वैष्णवी कांबळे, अमृता पुजारी, सहीज्ञा येवले, वैष्णवी वेडे, श्लोक शिंदे, श्वेता भदरगे, अथर्व येवले, ईश्वरी शिरसाठ, किरण गौतम, संगीता चव्हाण, स्वीटी ठोंबरे, अयुष शेट्टी, अथर्व कुडले, सिमरन खान आणि आकाश निषाद विद्यार्थ्यांच्या चित्राचा समावेश होता.

स्पर्धेचे आयोजन कलाशिक्षक श्री. योगेश कोठावदे यांनी केले. परीक्षण श्री. चंद्रकांत जोशी आणि श्री. विक्रम शिंदे यांनी केले.

पारितोषिक वितरण कार्यक्रम प्रसंगी बँक ऑफ बडोदा लोणावळा शाखेचे शाखा व्यवस्थापक श्री. रुपेश वाघमारे, राज्य भाषा मंडळ अध्यक्ष पुणे विभागाच्या श्रीमती मालविका मॅडम, प्रशालेचे प्राचार्य श्री. उदय महिंद्रकर, उपप्राचार्य श्री. आदिनाथ दहिफळे, पर्यवेक्षक श्री. विजय रसाळ, श्री. श्रीनिवास गजेंद्रगडकर, पर्यवेक्षिका श्रीम.क्षमा देशपांडे, मुख्य लिपिक श्री. कुंडलिक आंबेकर, शिक्षक प्रतिनिधी श्रीम. ज्योती डामसे, शिक्षकेतर प्रतिनिधी श्रीम. संजीवनी आंबेकर, सांस्कृतिक समिती प्रमुख श्री. धनंजय काळे आणि कलाशिक्षक श्री. महेश चोणगे उपस्थित होते.

स्पर्धेसाठी सहभागी विद्यार्थ्यांचे तसेच बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे नियामक मंडळाचे अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ. सतीश गवळी, सहकार्यवाह श्री. विजय भुरके नियामक मंडळ सदस्य तथा शाला समिती अध्यक्ष श्री. भगवानभाऊ आंबेकर यांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सोमनाथ ढुमने तर उपस्थितांचे आभार प्राचार्य श्री. उदय महिंद्रकर यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...