शिर्डी प्रतिनिधी :
आज दिनांक १ जुलै २०२४ रोजी साईसेवा निवासी मतिमंद मुला-मुलींची शाळा शिर्डी येथे कृषी दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने हरित क्रांतीचे जनक महानायक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुनंदा घुले मॅडम यांच्या शुभहस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व पुष्पहार घालण्यात आला. व विद्यालयातील कर्मचारी व विद्यार्थी यांच्याकडून विनम्र अभिवादन करण्यात आले.
कृषी दिनाचे औचित्य साधून विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हस्ते विद्यालयाच्या परिसरात वेगवेगळ्या प्रकारच्या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. त्यामध्ये लिंबू -२,चिक्कू -२, सीताफळ-१, अंजीर ३, पेरु-२ अशा प्रकारच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वीरित्या पाडण्यासाठी विद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा