साक्री तालुका व्हाईस आॅफ मिडीयातर्फे पत्रकारांच्या विविध मागण्या संदर्भात तहसीलदारांना निवेदन
------------------------------------
शिर्डी
पिंपळनेर येथे व्हाईस ऑफ मीडिया या संघटनेच्या साक्री तालुका शाखेच्या वतीने पत्रकारांच्या न्याय व हक्क मागण्यासंदर्भात लेखी निवेदन देऊन धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी पत्रकारांच्या असलेल्या प्रलंबित मागण्या व शासनाकडून वृत्तपत्रांना दिल्या जाणाऱ्या जाहिरातीत बाबत मिळत असलेली सापत्न वागणूक थांबवावी व समसमान न्याय पद्धतीने विचार व्हावा अशी मागणी यावेळी करण्यात आली . व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष भूषण अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष राजेंद्र गवळी, विशाल बेनुस्कर ,अंबादास बेनुस्कर, भिलाजी जिरे ,गणेश गावितं, भरत बागुल,जगदीश ओझरकर, अजय शास्त्री, संदीप बच्छाव, विशाल गांगुर्डे ,अनिल बोराडे , दिलीप बोळे यांच्यासह अनेक पत्रकार बांधव यावेळी सहभागी झाले होते. याप्रसंगी तालुका अध्यक्ष राजेंद्र गवळी यांनी विचार मांडताना सांगितले की, पत्रकारांना मिळणाऱ्या मानधनांवर त्यांचे घर चालत नाही, म्हणून पत्रकारांच्या मानधनाच्या संदर्भात शासनाने ठोस निर्णय घ्यावा, यासाठी कमिटी स्थापन करून कमिटीच्या सूचनेनुसार मानधनाचा निर्णय घेण्यात यावा शासनाने पत्रकार संघटनांना कमिटीवर स्थान द्यावे. असे सांगितले. लेखी निवेदनात नमूद आहे की, विधानसभा निवडणुकीतील सणवार, उत्सव या काळात यादीवरील सर्व छोटे दैनिक साप्ताहिक, लोकाभिमुख असलेल्या न्यूज पोर्टल, युट्युब चॅनेल यांना पण जाहिराती देण्यात याव्यात सर्वांना समान न्यायाने जाहिरातीचे वाटप करून शासनाकडून देण्यात येणाऱ्या जाहिराती दैनिकांप्रमाणे साप्तांकांना देण्यात याव्यात. अन्याय करू नये.आर एनआर कडून नवीन नियमावलीनुसार लादण्यात आलेल्या ज्याच्याकडे रद्द करावेत तसेच रेल्वे प्रवासासाठी अधिस्वीकृती धारकांना पुन्हा सवलत द्यावी. यांच्यासह पत्रांमध्ये मिळणाऱ्या छोट्याशा मानधनावर पत्रकार समाधानी नसून या मानधना संदर्भात शासनाने ठोस निर्णय घेऊन कमिटी स्थापन करावी त्या कमिटीद्वारे पत्रकारांचे मानधन ठरवण्यात यावे.तसेच सेवानिवृत्ती योजनेची वाढलेली रक्कम येत्या महिन्यापासून देण्यात यावी. जे जे श्रमिक पत्रकारांना राज्य शासनाच्या सेवानिवृत्ती योजनेचा लाभ मिळावा, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. याप्रसंगी तहसीलदार दत्तात्रय शेजुळ यांनी व्हाईस ऑफ मीडियाच्या पत्रकार संघटनेच्या मागण्यासंदर्भात त्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवले जातील असे आश्वस्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा