शुक्रवार, १२ जुलै, २०२४

राहाता येथे सर्व सार्वजनिक, सहकारी व धर्मदाय संस्थेत लोकशाही मार्गाने निवडणूक झालीच पाहिजे..-सत्यशोधक

राहाता येथे सर्व सार्वजनिक, सहकारी व धर्मदाय संस्थेत लोकशाही मार्गाने निवडणूक झालीच पाहिजे..-सत्यशोधक 

   राहाता येथे नुकत्याच पार पडलेल्या माळी पंच ट्रस्ट राहाता येथे विश्वस्त निवडणूक लोकशाही पध्दतीने झाली यामुळे अनेक सर्वसामान्य व खरे सामाजिक काम करणाऱ्या नवीन लोकांना संधी मिळाली..याचाच धागा पकडून नवीन निर्वाचित विश्वस्त दौलतराव घोडेकर यांचा सत्कार सत्यशोधक भानुदास गाडेकरजी व मित्रमंडळ याकडून करण्यात आला.. याप्रसंगी बोलताना भानुदास गाडेकरजी यांनी सांगितले की, माळी पंच राहाता यांनी भारतीय संविधानाची लोकशाही मूल्ये जपून निवडणूक घेतली.. त्यामुळे अनेक नवीन व खरे काम करणाऱ्या लोकांना संधी मिळाली..समाजानेही खरे काम करणाऱ्या लोकांच्या कामाची जाणिव ठेवून उमेदवार निवडून दिले..जर अशाच प्रकारे इतर धर्मदाय आयुक्त मान्यता प्राप्त संस्थेत अशाच प्रकारे निवडणुका झाल्या तर अनेकांना या लोकशाहीच्या उत्सवात भाग घेता येईल.. यामुळे लोकशाही मूल्ये व भारतीय संविधानिक मूल्ये यांचा प्रचार प्रसार होईल..तसेच सहमती होऊन एकहाती सत्ता व धुरा राहिल्यास केंद्रीकरण होऊन भ्रष्टाचाराला खतपाणी घातले जाईल.. यामुळे आता प्रत्येक संस्थेत सभासद संख्या वाढवून लोकशाही पद्धतीने निवडणूक झालीच पाहिजे.. धार्मिक ट्रस्ट, पतसंस्था,को ऑपरेटिव्ह बॅंक,सोसायटया व इतर अनेक ठिकाणी सहमती ऐवजी थेट निवडणूक होऊन उमेदवार निवडले गेले पाहिजे.. यामुळे भ्रष्टाचार होणार नाही हा फायदा आता ओळखला पाहिजे.. विरभद्र ट्रस्ट मध्ये अशाच प्रकारे लोकशाही मार्गाने निवडणूक होऊन सगळ्या गावातील जातींना विश्वस्त होण्याची संधी दिली पाहिजे.

राष्ट्रीय समाज पक्षाचे उपाध्यक्ष बाळासाहेब गिधाड यांनी याप्रसंगी घोडेकर यांचा सत्कार करुन मनोगत व्यक्त केले की, लोकशाहीने सर्वसामान्य उमेदवारांना संधी मिळते यामुळे समाजात लोकशाही मूल्ये रुजली जातात याबद्दल त्यांनी माळी पंच कमिटी चे अभिनंदन केले.

*याप्रसंगी नवनिर्वाचित विश्वस्त घोडेकर यांचा सत्कार विष्णुपंत सदाफळ व बाळासाहेब गिधाड यांनी केला..याप्रसंगी माजी मुख्याधिकारी बाळासाहेब गुळवे ,माजी लेखाधिकारी जयवंतराव घोडेराव, अरुणकाका कोरडे,ॲड.सुनिल सोनावणे, विरभद्र ट्रस्ट भगत सर्जेराव भगत, भाऊसाहेब गाडेकर, निवृत्ती बनकर, दत्ताभाऊ बोरकर, नानाभाऊ भुजबळ,पिलगर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...