शनिवार, १५ जून, २०२४

बाल कलाकारांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे -डॉ राजेंद्र पिपाडा

बाल कलाकारांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे
 -डॉ राजेंद्र पिपाडा 
राहता=
 इतक्या कमी वयात एवढे वकृत्व कौशल्य अवगत करणे सोपी गोष्ट नाही. अशा मुलांच्या कला गुणांना वाव देऊन त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. त्याचाच एक भाग म्हणून राहाता येथील बालशिवव्याख्याता धनराज शेटे याला भेट म्हणुन अँन्ड्रॉईड मोबईल भेट देण्यात आला तसेच राहाता नगरपालिकेच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.ममता पिपाडा व डॉ.राजेंद्र पिपाडा यांच्या हस्ते धनराज याचा बजरंगबलीची शाल घालुन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी त्याने छत्रपती संभाजी महाराजांच्या क्रूर हत्येचा प्रसंग आपल्या छोटेखानी व्याख्यानातून अत्यंत प्रभावीपणे सादर केला. अंगावर रोमांच उभे राहिल आणि डोळे पानवतील अशा शब्दात त्याने प्रसंगाचे वर्णन केले. डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी धनराजच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. 
बाल शिवव्याख्याता धनराज शेटे हा चौथीच्या वर्गात शिकतो. परंतु इतक्या कमी वयात त्याची वक्तृत्वशैली कौतुक करण्यासारखी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असो किंवा धर्मवीर संभाजी महाराज यांची जयंती असो, स्वातंत्र दिन, प्रजासत्ताक दिन तसेच अनेक शालेय कार्यक्रमात वकृत्व स्पर्धेत भाग घेवुन धनराज शेटे यांने आपला ठसा उमटवला आहे. मोठ-मोठ्या वक्त्यांना लाजवेल अशा प्रकारे शब्दफेक करुन अत्यंत कमी वयात श्रोत्यांचे मन जिंकण्याचे काम या बालकाने केले आहे. राहाता शहरासाठी हि अभिमानाची गोष्ट आहे. अशा या बाल कलाकारांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. असे मनोगत याप्रसंगी डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी व्यक्त केले. 
यावेळी सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे यांनीही आपले मनोगत व्यक्त करत त्यांनी हनुमान चालीसा सेवा मंडळाच्या वतीने आभार व्यक्त केले. यावेळी धनराज याने आभार व्यक्त केले यावेळी बोलताना तो म्हणाला की, बरेचशे राजकारणी फक्त आश्वासन देतात व ते पाळत नाहीत परंतु डॉ.राजेंद्र पिपाडा व सौ.ममता भाभी पिपाडा यांनी हनुमान जयंतीच्या दिवशी मला मोबाईल देण्याचे आश्वासीत केले होते व त्यांनी आज मला घरी बोलावुन माझा सन्मान करुन दिलेले आश्वासन पुर्ण केले याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. 
 यावेळी महावीर पिपाडा,साहील पिपाडा,निखील पिपाडा,समाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे,ज्ञानेश्वर शेटे आदी यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

शिर्डीत आयुर्वेद महाशिबिर यशस्वी

शिर्डीत आयुर्वेद महाशिबिर यशस्वी शिर्डी :  श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था यांच्या वतीने श्री साईनाथ रुग्णालय येथे दि. 21...