रविवार, १६ जून, २०२४

पढेगावच्या यशवंत विद्यालयात नवागतांचे स्वागत...

पढेगावच्या यशवंत विद्यालयात नवागतांचे स्वागत...

शिर्डी प्रतिनिधी : 

            दरवर्षीप्रमाणे यावर्षी इ.पाचवी ते दहावीला नवीन आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत आणि मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप यशवंत विद्यालय,पढेगाव येथे संपन्न झाले. यावेळी SSC/HSC परीक्षेतील प्रथम तीन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यालयाने आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम ठेवत इ.10वी, इ.12 वी च्या निकालात घवघवीत यश संपादन केले...
           यावेळी राजेंद्र गायकवाड यांनी सेवानिवृत्त झाल्याबद्दल विद्यालयास 21 हजार रुपये ची देणगी प्रदान केली. माजी प्राचार्य शिवाजीराव लबडे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले...
          या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य अच्युतराव पा.बनकर होते...व्यासपीठावर अण्णासाहेब पा.बनकर, बापूसाहेब पा.काळे,माजी प्राचार्य शिवाजीराव लबडे,प्राचार्य राजेंद्र धरम,पर्यवेक्षिका हेमलता साबळे,राजेंद्र गायकवाड,आप्पासाहेब मोरे,चंद्रकांत जोर्वेकर,शिवाजी बडाख,रामदास बोरगे, मंगल कदम,माधुरी भाग्यवान,गजानन पारे,सोमनाथ पटारे, महेश कोल्हे,ग्रंथालय प्रमुख सोमनाथ पटारे,महेश कोल्हे,विजय माळी,विजय कोकणी, मंगल बर्डे,शुभम शेलार, सोमनाथ गायकवाड, गोरक्षनाथ शिंदे,रभाजी नान्नोर,प्रशांत देशमुख,सागर वायखिंडे,राहुल लासुरकर,मंगल तापोळे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद डोंगरे यांनी केले आणि सतीश उखर्डे यांनी आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

डॉ. संजय दिघे यांनी पशु वैद्यकीय सेवेत मुक्या प्राण्यांवर माया बरोबरच माणसं जोडली-डॉ.दशरथ दिघे

पानेगांव   राज्य शासनाच्या पशुवैद्यकीय सेवेत ३३ वर्ष अविरत सेवेत मुक्या प्राण्यांवर माया त्याच बरोबर गोड मितभाषी स्वभावतुन माणसं...