रविवार, १६ जून, २०२४

न्याहळोद येथे दहावी च्या बोर्ड परीक्षेत ९४.२०% विद्यार्थीनीचे सत्कार

न्याहळोद येथे दहावी च्या बोर्ड परीक्षेत ९४.२०% विद्यार्थीनीचे सत्कार

शिर्डी प्रतिनिधी :  

न्याहळोद आणि परिसरातील होतकरू शेतकरी, आपल्या शेतीत विविध प्रयोगात्मक पिके घेणारे तसेच आधुनिक शेती करणारे आदर्श आणि प्रगतिशील शेतकरी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता आदरणीय श्री. कैलास भाऊ रोकडे आणि सौ. हेमलता कैलास रोकडे यांची कन्या कु. यशश्री कैलास रोकडे हिला इयत्ता दहावी च्या बोर्ड परीक्षेत ९४.२०% मिळून तिने आपल्या रोकडे परिवाराचे व राजे छत्रपती संभाजी हायस्कूलचे नाव लौकिक केले. या यशात तिला तिचे वर्गशिक्षक एन. एस. पाटील, डी. व्ही. पाटील मुख्याध्यापिका सौ. शिंदे मॅडम तसेच काका मुरलीधर रोकडे मुख्याध्यापक व काकू शिक्षिका भारतीताई रोकडे वडील कैलास भाऊ रोकडे, आई हेमलता रोकडे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. यावेळी या यशाबद्दल सेवानिवृत्त कें द्रप्रमुख आबासाहेब श्री. सी. बी. भदाणे च्या हस्ते त्यांच्या निवासस्थानी जाऊन शाल, पुष्पगुच्छ आणि पेढा भरून यशश्री चे अभिनंदन करण्यात आले.

याप्रसंगी पत्रकार ज्ञानेश्वर माळी, अॅड. ज्ञानेश्वर महाजन, पालक कै लास रोकडे, आई हेमलता रोकडे, मोठी आई भारतीताई रोकडे, सौ. जया माळी, अॅड. अरुणा महाजन आदी मान्यवर उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

डॉ. संजय दिघे यांनी पशु वैद्यकीय सेवेत मुक्या प्राण्यांवर माया बरोबरच माणसं जोडली-डॉ.दशरथ दिघे

पानेगांव   राज्य शासनाच्या पशुवैद्यकीय सेवेत ३३ वर्ष अविरत सेवेत मुक्या प्राण्यांवर माया त्याच बरोबर गोड मितभाषी स्वभावतुन माणसं...