धनगरवाडी ग्रामपंचायत कार्यालयात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा
धनगरवाडी=
राहता तालुक्यातील धनगरवाडी ग्रामपंचायत कार्यालयात शिवराज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त भगवा झेंडा फडकवून व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला धनगरवाडीचे लोकनियुक्त सरपंच गोपीनाथ खरात पुष्पहार अर्पण करून पूजा करण्यात आली. या कार्यक्रमाला धनगरवाडीचे उपसरपंच साहेबराव आदमाने, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानदेव लोखंडे, अशोक रक्टे, महेश रक्टे, अंकुश रक्टे, ग्रामसेविका सौ. प्रियंका शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा