गोवा काॅटेज हिंदी हाॅरर चित्रपटाचा मुहूर्त संपन्न....
शिर्डी-
आज दि. 06/06/2024 रोजी तनुश्री मुव्हिज् फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत, गोवा काॅटेज या हिंदी चित्रपटाचा मुहूर्त शिरडी येथे हाॅटेल साई मिरॅकल येथे संपन्न झाला. या प्रसंगी शिरडीतील उद्योजक मा. श्री. संदीप भाऊ लोढा यांच्या हस्ते स्क्रिप्ट चे पुजन झाले. तसेच संदिप भाऊ यांनी क्लॅप देवून शुभारंभ केला.
चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक राज भालेराव यांनी लवकरच चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होत आहे, असे सांगितले. या कार्यक्रमात डि. ओ. पी. संजय गायकवाड, निर्माता व दिग्दर्शक अनिस शेख, नाट्यकर्मी रंगनाथ वैद्य, गणेश शेरे, कदम प्रविण, संपादक महेश सिनारे सर, दगू राक्षे, सोमनाथ लांडे, भरत भोसले, मयूर पवार, इत्यादी उपस्थित होते.
या चित्रपटाचे चित्रीकरण शिरडी, राहता, गोवा या ठिकाणी होणार असल्याचे दिग्दर्शक राज भालेराव यांनी सांगितले. या चित्रपटाचे चित्रीकरण चांगल्याप्रकारे होऊन यास यश मिळेल अशी इच्छा संदीप भाऊ यांनी व्यक्त केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा