शुक्रवार, २४ मे, २०२४

प्रा.मोतीलाल सोनवणे राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित

प्रा.मोतीलाल सोनवणे राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित

शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन)


     अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या वतीने प्रा. मोतीलाल सोनवणे यांना राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला. ठाणे जिल्ह्यामधील ठाणे शहरामध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी काव्य संमेलनामध्ये उपस्थित मान्यवरांचा हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह शाल आणि ग्रंथ भेट दिली जाईल.
     कार्यक्रम रविवार दिनांक २ जून २०२४ सायंकाळी ४ वाजता होणार आहे. ठिकाण मराठी ग्रंथ संग्रहालय, पहिला मजला, गोल्ड प्रभात सिनेमा समोर, जिल्हा परिषद जवळ, ओल्ड स्टेशन रोड ठाणे (प.) या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...