शुक्रवार, २४ मे, २०२४

द्रोणा ज्युनियर कॉलेजचे बारावी परिक्षेत यश

 द्रोणा  ज्युनियर कॉलेजचे बारावी परिक्षेत यश

शिर्डी  : 

राहाता  तालुक्यातील साकुरी येथील अशोकराव दामोधर दंडवते पाटील ग्रामीण शैक्षणिक प्रतिष्ठानच्या द्रोणा अकॅडमीतील उच्च माध्यमिक मधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे.
द्रोणा कॉलेज मधील विज्ञान विभागातून प्रथम क्रमांक साई किरण लहामगे ७८.५० टक्के, द्वितीय क्रमांक ओम सुनील कुंभकर्ण ७३.५० टक्के, तृतीय क्रमांक श्रेयस संदीप बोराडे ७२.३३ टक्के यांनी पटकावला. तर वाणिज्य विभागातून प्रथम क्रमांक दिशा गोविंद गरुर ७३.६७ टक्के, द्वितीय क्रमांक सुमित दिनेश उपाध्ये ७१.६७ टक्के, तृतीय क्रमांक निकुंज अश्विन पटेल ७१.३३ टक्के यांनी पटकावला. संस्थेचे कार्यकारी विश्वस्त जयराज दंडवते, संस्थेच्या संचालिका प्राजक्ता जयराज दंडवते, संचालक अनुप दंडवते, प्राचार्या अनिता रोहोम, शिक्षक, शिक्षिका यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. यावेळी संस्थेचे कार्यकारी विश्वस्त जयराज दंडवते म्हणाले, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच अन्य क्षेत्रामध्येही विद्यार्थ्यांची यशस्वी तयारी करून घेतली जात असल्याने विद्यार्थ्यांमध्ये परिपूर्ण विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. द्रोणा ज्युनिअर कॉलेजची शैक्षणिक गुणवत्ता कायम उंचावत राहाण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. इयत्ता बारावीतील सर्व विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन केले व सर्व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक कार्यासाठी व वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...