*लहान मुला-मुलीना शालेय शिक्षणाबरोबरच आध्यात्मिक शिक्षणाची गरज - विशालभाऊ धनगर*
शिर्डी =
आजच्या युगामध्ये लहान मुलांना चांगले संस्कार लागावे यासाठी प्रत्येक गावामध्ये परमार्थिक बाल संस्कार शिबिर आयोजित करून बालवयामध्ये मुला-मुलींना अध्यात्माचे धडे देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन पानसवाडी चे युवा नेतृत्व विशाल धनगर यांनी केले
२०/५/२४ ते ११/६/२४ या कालावधीमध्ये नेवासा तालुक्यातील पानसवाडी गावामध्ये प.पु.गु.दत्तात्रय म सुद्रीक पाटील यांच्या आशिर्वादाने व ह .भ.प रविंद्रनाथ महाराज सुद्रीक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच हभप राधाताई विरकर , ह.भ.प अनुष्का ताई टापरे व शाम महाराज विरकर यांच्या अधिपत्याखाली चालू असलेल्या बालसंस्कार शिबिरामध्ये राधाताई बोलत होत्या शिबिरामध्ये योगासने , श्लोक, विष्णु सहस्त्रनाम , गितापाठ, ज्ञानेश्वरी ,अभंग, पखवाज, हार्मोनियम, सांप्रदायिक चाली ,टाळ वाजवणे,पावल्या हरीपाठ यासारखे परमार्थिक शिक्षण देण्यात येत आहेत शिबिर चालू झाल्यापासून मुलांच्या हातामध्ये मोबाईल पूर्णपणे नजरेआड झालेला आहे त्यामुळे मुलांना मोबाईलची आठवणही झाली नाही , परमार्थिक बालसंस्कार शिबीराच्या माध्यमातून धर्मकार्याचे शिक्षण घेतलेले विद्यार्थी निश्चितच भविष्य काळामध्ये वारकरी संप्रदायातील गुणवत्ता प्रवचनकार कीर्तनकार सुसंस्कृत तसेच गुणवंत सेवेकरी होतील , "संस्कार टिकले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर भारत देश टिकेल" असा विश्वास ह भ प राधाताई विरकर , व ह भ प भगवान महाराज बोरुडे यांनी दिला या शिबिर करिता ह भ प गायनाचार्य मच्छिंद्र महाराज जाधव, दत्तात्रय महाराज गीते, शिवाजी महाराज जाधव, सौरव महाराज जगताप यांनी चांगली साथ देत लहान मुलाबरोबर हरीपाठ , भजनामध्ये आनंद व्यक्त करून शिबीराची शोभा वाढवली, आज शनिवार दि. २५/५/२०२४ रोजी शिबिरातील लहान मुला- मुलीना अन्नदान करण्याचे भाग्य प्राप्त झाले यामध्येच मोठा आनंद मिळतो आसे विशाल धनगर यांनी म्हटले. तसेच पानसवाडीतील वारकरी संप्रदायातील भाविकांनी अन्नदान करत निष्ठा जपली.सदरील शिबीरातून आध्यात्मिक शिक्षणाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाची आधारस्तंभ घडावे हीच या शिबिरामागील उद्दिष्टे आहेत .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा