रविवार, २६ मे, २०२४

श्री साई संस्थान मंदिर पुजारी उल्हासराव अनंतराव वाळुंजकर गुरुजी यांच्या सेवापुर्ती समारंभ मोठ्या उत्साहात साजरा

श्री साई संस्थान मंदिर पुजारी उल्हासराव अनंतराव वाळुंजकर गुरुजी यांच्या सेवापुर्ती समारंभ मोठ्या उत्साहात साजरा

शिर्डी प्रतिनिधी :

शिर्डी श्री साई संस्थान मंदिर पुजारी उल्हासराव अनंतराव वाळुंजकर गुरुजी यांच्या सेवापूर्ती समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी भागवताचार्य ह भ प प्रतीक्षा ताई जाधव यांचे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ब्रह्म वृद्धाकडून मंत्रोपचारम करण्यात आले उल्हासराव वाळुंजकर गुरुजी मंदिराच्या चारी आरत्या भजन गायन चांगल्या प्रकारे बाबांची सेवा केली यावेळी वाळूंजकर गुरुजी म्हटले की माझ्या लग्नाला पण एवढी गर्दी नव्हती एवढी गर्दी सेवापुर्ती कार्यक्रमाला होती गुरुजी पुढे म्हणाले की ब्राह्मण लोक अन्नदान करत नाही पण आम्ही उपवास करायला जरूर लावतो असे वाळूजकर गुरुजी म्हणाले यावेळी कार्यक्रमाला शिर्डी परिसरातील व श्रीकृष्ण नगर मधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी खिचडीचा प्रसाद वाटपाचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमाला साई निर्माण ग्रुपचे अध्यक्ष विजय भाऊ कोते साई संस्थान सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार व्हाईस चेअरमन पोपटराव कोते संचालक भाऊसाहेब कोकाटे, द्वारकामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष ताराचंद कोते, अशोकराव कोते, पत्रकार संजय महाजन आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. व ब्राह्मण एकता समजाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष हे सुद्धा आवर्जून उपस्थित राहिले.
समस्त मित्रपरिवार वाळुंजकर परिवार व श्रीकृष्ण नगर मधील सर्व स्नेही आल्यामुळे कार्यक्रमाला खूपच छान शोभा आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...