मंगळवार, २८ मे, २०२४

एकरुखे येथे वाडी वस्त्यांवर बिबट्याचा संचार

एकरुखे येथे वाडी वस्त्यांवर बिबट्याचा संचार 
 एकरुखे - 
   राहाता तालुक्यातील एकरुखे येथील जलसंपदा चरा जवळील  आग्रे वस्ती व जोरे वस्ती परिसरात बिबट्याची दहशत वाढली असून साधारणतः 10 ते 15 दिवसापूर्वी एक , दोन कुत्र्यांचा   फडशा या बिबट्याने  पाडला आहे तसेच 15 दिवसानंतर आज रात्री 8 ते 8.30 च्या दरम्यान एक मोटर सायकल स्वार ला रस्त्याने जात असताना त्याला तो समोर दिसला त्यावेळी  तिथे थांबून त्याने समोरील वस्तीवरील नागरिक यांना बोलावून बॅटरी चा उजेडात पाहिले असता तो समोरच्या चाऱ्याच्या गवतात शिरला .तरी या परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे . संध्याकाळी 7 नंतर घरबाहेर निघणे मुश्किल झाले आहे तसेच सायंकाळी  दूध घालण्यासाठी   तसेच 8 दिवस  रात्रीची वीज असल्याने मोटर चालू करण्यासाठी  शेतकऱ्यांना बाहेर पडावे लागते तरी आता वनविभागाने दखल घेऊन या परिसरात पिंजरा लावण्यात यावा असे या परिसरातील नागरिकांची मागणी आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...