मंगळवार, २८ मे, २०२४

अकरावी प्रवेश प्रक्रियेमधील पालक, विद्यार्थ्यांची दिशाभूल थांबवा:- रमेश शिंदे


अकरावी प्रवेश प्रक्रियेमधील पालक, विद्यार्थ्यांची  दिशाभूल थांबवा:- रमेश शिंदे
     राहाता =
       माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत फेब्रुवारी / मार्च 2024 एस.एस.सी. परीक्षेचा ऑनलाईन पद्धतीने निकाला लागला . पालक व विद्यार्थ्यांची अकरावी  वर्गात प्रवेश घेण्यासाठी धावपळ सुरू झाली. दहावी व बारावीचे वर्ष हे विद्यार्थ्यांच्या जीवनाला कलाटणी देणारे वर्ष असते. प्रत्येक पालकाला आपल्या पाल्याचा प्रवेश चांगल्या कॉलेजमध्ये व्हावा व त्याच्या जीवनाला चांगले वळण लागावे या दृष्टिकोनातून पालक चांगल्या कॉलेजच्या शोधात असतो. त्याचा फायदा काही विनाअनुदानित तत्त्वावर चालणारे कॉलेज सध्या घेताना दिसून येत आहे .निकाला आधीच विद्यार्थ्यांना वेगवेगळे प्रलोभने दाखवून भरमसाठ फी त्यांच्याकडून आकारून शासकीय नियमांचे पालन न करता प्रवेश प्रक्रिया व पूर्ण करून घेणारे कॉलेज आज अस्तित्वात आहेत .
आज शासकीय पातळीवरून प्रवेशा संदर्भात मार्गदर्शक सूचना दिल्या जातात त्याचे पालन हे खाजगी विनाअनुदानित तत्त्वावर चालणारे कॉलेज करत नाहीत .एका बाजूला अनुदानित कॉलेजची पट पडताळणी व संच मान्यता विद्यार्थी संख्येवर केली जाते .अगदी एक दुसरा विद्यार्थी कमी असेल तर शिक्षकांचा व तुकडीचा प्रश्न निर्माण होतो व दुसऱ्या बाजूला फक्त नावाला प्रवेश व विद्यार्थी खाजगी क्लासेस ला असतात. फक्त फी भरा परीक्षा पुरतेच कॉलेजला या असेही सांगणारे बरेच कॉलेज आज दिसून येत आहेत. पालक या प्रलोभनांना बळी पडतात कॉलेजमध्ये कुठल्याही प्रकारचे प्रॅक्टिकल्स होत नाही. कॉलेजमध्ये प्रयोगशाळाही नाहीत अशा कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन उद्या विज्ञान विभागामध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी पुढे डॉक्टर व अभियंता कसे होणार हाही प्रश्न निर्माण झालेला आहे. शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे प्रवेश प्रक्रिया राबवली जाते का याकडे लक्ष देणे गरजेचे आहे .पालकाकडून होणारी पैशाची लूट थांबविणे गरजेचे आहे. पालकांनी विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करताना कॉलेजमधील भौतिक सुविधा ,प्रयोगशाळा, शिक्षक संख्या, शिक्षकांची शैक्षणिक पात्रता या सर्वांचा विचार करूनच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करणे गरजेचे आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...