मंगळवार, २१ मे, २०२४

शिर्डीच्या साईबाबांना आता राजेशाही थाटात नेवैद्य अर्पण

   
 
शिर्डीच्या साईबाबांना आता राजेशाही थाटात नेवैद्य अर्पण



शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन )


साईसमाधी मंदिरात बाबांना नेवैद्य दाखविण्याची अखंडित परंपरा आहे. परंतु हाच नेवैद्य आता राजेशाही थाटात, सुरक्षारक्षकांच्या ताफ्यासोबत विशिष्ट पोशाखात मंदिरातील चोपदार आता थेट समाधी मंदिर, दत्त मंदिर, चावडी व द्वारकामाई मंदिरात घेऊन जात आहे. हे दृश्य पाहून अनेक साईभक्तांना कुतूहल वाटत आहे. कारण यापूर्वी हा नेवैद्य कुठे बनविला जातो आणि कुठे दाखविला जातो, याची माहिती भाविकांना नव्हती.

दुपारची मध्यान आरती, संध्याकाळची धुपारती यावेळी बाबांना विविध प्रकारचे भोजनरुपी नेवैद्य दाखविण्याची परंपरा आहे. याचे खास वैशिष्ट म्हणजे बाबांच्या आवडीचा झुणका, भाकर, कांदा या पदार्थांचा नेवैद्य रोज धुपारतीला दाखविला जातो. हा नेवैद्य बाबांच्या कोठीत व प्रसादालयात बनविला जातो. आरती पार पडल्यानंतर वरील सर्व नेवैद्य वरील मंदिरात दाखविल्यानंतर एक नेवैद्य चोपदाराला देण्याची परंपरा आहे. कारण नेवैद्य घेऊन येण्याचा मान हा फक्त चोपदारांनाच आहे. अशातच अगदी राजेशाही थाटात, सुरक्षारक्षकांसमवेत एका विशिष्ट पोशाखात हे चोपदार संस्थानच्या गाडीतून थेट साई समाधी मंदिरात घेऊन येत आहे यापूर्वी असं होत नव्हतं परंतु साईभक्त तात्या पाटील कोते यांचे नातू व मानकरी सर्जेराव कोते यांनी बाबांना दाखविला जाणारा नेवैद्य हा राजेशाही थाटात मंदिरात आणला जावा, अशी मागणी करून निवेदन दिले होते. त्यांनी याचा पाठपुरावा अनेक वर्षांपासून केला होता.

अखेर साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी कोते यांची मागणी मान्य केली. कारण हा भाविकांच्या श्रध्देचा विषय आहे. हा नेवैद्य साई प्रसादालयातील दररोज बनविल्या जाणाऱ्या स्वयंपाकात एकत्र करून सर्व भाविकांना प्रसादाचा लाभ मिळावा, हा यामागील हेतु आहे.

साईभक्त बायजाबाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष सर्जेराव कोते व शिर्डी ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून हा निर्णय घेण्याचं भाग्य मला मिळालं असून या सर्वांच्या सहकार्यामुळेच मंदिरातील रूढी परंपरा याची माहिती भविकांपर्यंत पोहचत आहे. - गोरक्ष गाडीलकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, साई संस्थान


साईबाबा हे आमचे आणि भाविकांचे राजे आहेत, म्हणून त्यांना दररोज दाखविला जाणारा नेवैद्य हा राजेशाही थाटात नेण्यात यावा ही माझी इच्छा व मागणी साई संस्थान प्रशासनाने पूर्ण केली. मी त्यांचा आयुष्यभर ऋणी राहील.
- सर्जेराव कोते
अध्यक्षा, बायजाबाई प्रतिष्ठान

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...