राहाता येथिल शारदा ज्युनिअर कॉलेज चा 12 वी निकाल 89.73%
राहता प्रतिनिधी -
राहता येथील रयत शिक्षण संस्थेच्या शारदा ज्युनिअर कॉलेजचा फेब्रुवारी /मार्च 2024 चा निकाल ऑनलाईन पद्धतीने लागला. त्यामध्ये 341 विद्यार्थ्यांनी बोर्ड परीक्षा दिली होती. त्यामध्ये सायन्स विभागाचा निकाल 100% लागला.
प्रथम क्रमांक -कु.गिधाड आरती अण्णासाहेब-85.83%
द्वितीय क्रमांक - कु. मुरादे साक्षी राजू-81.67% व
तृतीय क्रमांक - बागुल ऋषिकेश मुरलीधर-81.00%
कॉमर्स विभागाचा निकाल -95.04% लागला .
या विभागाचा प्रथम क्रमांक कु. कोंचीकर राजेश्वरी अनिल 82.50% .
द्वितीय क्रमांक- कु. बोऱ्हाडे सार्थक सतिष- 81.83% व
तृतीय क्रमांक -कु. डांगे साईनाथ संजय-80.33% मार्क मिळाले. अकाउंट विषयात डांगे साईनाथ संजय या विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण मिळवून विशेष नावलौकिक मिळवलेला आहे
कला विभागाचा निकाल -68.96% टक्के लागला.
प्रथम क्रमांक कु. बोऱ्हाडे श्रृती पंकज- 75.33%.
द्वितीय क्रमांक - निकाळे प्रशांत किशोर- 68.17%
तृतीय क्रमांक - कु. बोधक तेजश्री रावसाहेब -68.2 % मिळाले.
किमान कौशल्य विभागाचा निकाल 83.87 टक्के लागला. एम.सी.व्ही.सी. विभागामध्ये
प्रथम क्रमांक- बनसोडे अभिषेक केतन -64.17 %
द्वितीय क्रमांक - डुकरे तेजस कैलास-62.33%
तृतीय क्रमांक - राहींज साहिल सोमनाथ_61.67 % व जावळे अविनाश गोरक्षनाथ 61.67मार्क मिळाले .
यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन शारदा शैक्षणिक संकुलाचे प्राचार्य प्रमोद तोरणे सहाय्यक विभागीय अधिकारी उत्तर विभाग, स्कूल कमिटीचे अध्यक्ष रमेश भाऊ शिंदे पाटील ,उपप्राचार्य रामभाऊ गमे,मुख्याध्यापिका विद्या ब्राम्हणे. प्राचार्य निशा चेंगोट ,प्रा.शरद गमे, प्रा. राजेंद्र पटारे, प्रा. महेश बाविस्कर ,प्रा. सोपान मोरे, प्रा. अशोक बोरसे प्रा. शाम जगताप ,रमेश आहेर आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले . निकालामुळे सर्व विद्यार्थी, पालक वर्गामध्ये अतिशय आनंदाचे वातावरण होते. शारदा जुनिअर कॉलेज हे अनुदानित ज्युनिअर कॉलेज असून विद्यार्थी संख्या जास्त असून देखील ही निकालाची उत्कृष्ट परंपरा आहे. शारदा संकुलाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असल्यामुळे इयत्ता अकरावीच्या प्रवेशाची नाव नोंदणी उत्साह मध्ये पालकांनी केलेली आहे. तरी पंचक्रोशीतील अकरावीच्या पालक वर्गाने आपल्या पाल्याचा प्रवेश शारदा ज्युनिअर कॉलेजमध्ये निश्चित करावा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा