शुक्रवार, १७ मे, २०२४

शिर्डी येथे राज्यस्तरीय वधु वर पालक परिचय मेळाव्याचे फॉर्मचे अनावरण

शिर्डी येथे राज्यस्तरीय वधु वर पालक परिचय मेळाव्याचे फॉर्मचे अनावरण

शिर्डी प्रतिनिधी :

 श्री सद्गुरू साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पुण्यनगरी श्री क्षेत्र शिर्डी येथे संपन्न होणारा ४ था राज्यस्तरीय तेली समाज वधु-वर पालक परिचय मेळावा २०२४ वार रविवार दि.१०/११/२०२४ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ यावेळेत संपन्न होणार आहे   या ४ था राज्यस्तरीय वधु वर पालक परिचय  सोहळ्याच्या वधु वर फाॅमचे अनावरण शिर्डी येथे श्री खंडोबा मार्तंड भैरव, श्री सद्गुरू साईनाथ महाराज , गुरुवर्य वै हभप लक्ष्मण महाराज वाघचौरे , साईभक्त म्हाळसापती  यांच्या चरणी अर्पण करून साईभक्त म्हाळसापती यांचे पणतू व म्हाळसापती ट्रस्ट अध्यक्ष श्री संदीप नागरे यांच्या हस्ते श्री साईबाबांचे आशिर्वाद घेऊन वधु-वर मेळाव्याचे फार्मचे अनावरण करण्यात आले.
  यावेळी शिर्डी येथील तेली समाजाचे जेष्ठ समाजसेवक श्री हभप यशवंतराव महाराज वाघचौरे, ( जेष्ठ मार्गदर्शक ) , श्री मधुकरराव शेलार ( राहाता तालुका अध्यक्ष) , श्री दिपकराव चौधरी (शिर्डी शहर अध्यक्ष), श्री सचिन भाऊ लोखंडे ( जिल्हा सरचिटणीस ) श्री अनिलरव चौधरी, श्री दिलीपराव चौधरी, श्री अॅड.विक्रांत वाघचौरे ( जिल्हाध्यक्ष ) , श्री शशीकांत महाले, श्री भुपेंग्द्र मचाले,श्री बाळासाहेब नागरे, श्री राकेश भोकरे, श्री बद्रीनाथ लोखंडे ( प्रदेश अध्यक्ष अ भा तेली महाराष्ट्र राज्य )  आदी समाज बांधव व शिर्डी ग्रामस्थ आवर्जून उपस्थित होते.
          तुकाराम गाथा लेखक राष्ट्रसंत श्री संताजी महाराज व श्री सद्गुरू साईनाथांच्या  आशीर्वादाने पावन झालेल्या या शिर्डी पुण्यभूमी मध्ये होत असलेल्या राज्यस्तरीय शिर्डी वधु - वर मेळाव्याचे अर्ज  आजपासून ऑनलाईन व ऑफलाईन अश्या विविध माध्यमातून स्विकारले जातील याची नोंद सर्व समाज बांधवांनी घ्यावी ही विनंती शिर्डी वधु वर मेळावा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...