शनिवार, २९ नोव्हेंबर, २०२५

लोणी बुद्रुकमध्ये श्री दत्तजयंती उत्सवानिमित्त भव्य गुरुचरित्र पारायण व अखंड नामजप सप्ताह

लोणी बुद्रुकमध्ये श्री दत्तजयंती उत्सवानिमित्त भव्य गुरुचरित्र पारायण व अखंड नामजप सप्ताह

 
 लोणी  
 श्री स्वामी समर्थ सेवा,आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) लोणी बुद्रुक येथे यावर्षी श्री दत्तजयंती उत्सवानिमित्त भव्य व दिव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या आठ दिवसांच्या कालावधीत श्री गुरुचरित्र पारायण, अखंड नामजप, विविध यज्ञ-याग तसेच दत्त जन्मोत्सवाचे विशेष सोहळे असा अध्यात्ममय उत्सव रंगणार आहे.

या धार्मिक सप्ताहाची सुरुवात २८ नोव्हेंबर रोजी सकाळी मंगलमुखी मंत्रोच्चार, दीपप्रज्वलन आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आरतीने करण्यात आली. दिंडोरी प्रणित परंपरेनुसार या केंद्रात दरवर्षी दत्तजयंतीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी होत असून यंदा अधिक दिव्य आणि शास्त्रोक्त पद्धतीने कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

सप्ताहाच्या दरम्यान केंद्रात श्री गुरुचरित्र पारायण, स्वामी चरित्र पारायण, श्री स्वामी समर्थ नामजप, तसेच वीणा वादन आणि प्रहर सेवा यांचे दिवसभर सत्र आयोजित केले आहे. ‘श्री गुरुचरित्र’ आणि ‘स्वामी चरित्र’ हे दोन्ही ग्रंथ परम पवित्र मानले जातात. या ग्रंथांचे अखंड पारायण ऐकल्याने अध्यात्मिक उन्नती, मन:शांती आणि जीवनातील अडथळे दूर होतात, असा भाविकांचा दृढ विश्वास आहे. त्यामुळे परिसरातील अनेक साधक भक्तांनी या सप्ताहात सहभागी होण्याचे आवाहन केंद्राने केले आहे.

यज्ञ-यागांच्या विभागात यावर्षी अधिक विस्तृत होम–हवन कार्यक्रम आखण्यात आले आहेत. यात गणेश याग, चंडी याग, स्वामी याग, रुद्र याग यांसह विविध शास्त्रोक्त होम संपन्न होणार आहेत. यज्ञधुरिण ब्राह्मणांच्या मंत्रोच्चारांनी परिसरात अध्यात्मिक वातावरण अधिक पवित्र होणार असून भाविकांना प्रत्यक्ष होम-हवनाचे दर्शन घेण्याची संधी उपलब्ध राहणार आहे. या यागांमुळे वातावरण शुद्ध होते, मानसिक आणि आत्मिक बल प्राप्त होते तसेच कुटुंबाच्या कल्याणासाठी मोठा लाभ होतो, असे केंद्राचे सेवेकरी सांगतात.

या संपूर्ण अध्यात्मिक सप्ताहातील विशेष आकर्षण म्हणजे श्री दत्त जन्म उत्सव, जो दिनांक ४ डिसेंबर रोजी दुपारी १२:३९ वाजता मोठ्या भक्तिभावात साजरा केला जाणार आहे. दत्ताभिषेक, महापूजा, नामस्मरण, आरती आणि प्रसाद वितरण असा दिवसभर कार्यक्रम राहणार आहे. या दिवशी भाविकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आल्या असून मोठ्या संख्येने भक्त उपस्थित राहतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

सप्ताहाची सांगता दि. ५ डिसेंबर रोजी होणार असून सकाळी १०:३० वाजता महाआरती, महाप्रसाद आणि सत्संगाने उत्सवाची सांगता पार पडणार आहे. सेवेकरी व कार्यकर्त्यांच्या सहकार्यातून संपूर्ण आठवडा अध्यात्ममय वातावरणात पार पडेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

लोणी बुद्रुक आणि परिसरातील सर्व भाविकांनी या दिव्य धार्मिक सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा, आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) यांच्या वतीने करण्यात आले आहे.

बुधवार, २६ नोव्हेंबर, २०२५

शेतकऱ्याच्या मागणीची दखल घेऊन उच्चस्तरीय कालव्यांना तातडीने आवर्तन सोडण्याचे सूचना

लोणी 

निळवंडे धरणाच्या उच्चस्तरीय कालव्यातून पाणी सोडण्याच्या सूचना जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण पाटील यांनी विभागातील अधिकार्यांना दिल्या.

उच्चस्तरीय कालव्यातून पाणी सोडावे या मागणीसाठी माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जलसंपदा मंत्री ना विखे पाटील यांची भेट घेतली.भाजपाचे जेष्ठ नेते सिताराम भांगरे सुनिता भांगरे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सद्यपरिस्थितीत अकोले तालुक्यातील शेतकर्यानी मोठ्या प्रमाणात पिकांची लागवड केली आहे.पाऊसचा मोसम संपल्यापासून उच्चस्तरीय कालव्यांना पाणी सोडण्यात आलेले नसल्याची गंभीर बाब शिष्टमंडळाने मंत्री विखे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली.

शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेवून उच्चस्तरीय कालव्यांना तातडीने आवर्तन सोडण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.

मंगळवार, २५ नोव्हेंबर, २०२५

श्री साईबाबा कनिष्ठ महाविद्यालयाच्या आयन खलील खानची महाराष्ट्र शालेय व्हॉलीबॉल संघात निवड

श्री साईबाबा कनिष्ठ महाविद्यालयाच्या आयन खलील खानची महाराष्ट्र शालेय व्हॉलीबॉल संघात निवड

श्री साईबाबा कनिष्ठ महाविद्यालय, शिर्डी येथील इयत्ता बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेला विद्यार्थी आयन खलील खान याने राज्यस्तरीय निवड चाचण्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून महाराष्ट्र शालेय व्हॉलीबॉल संघात (19 वर्षे गट) निवड झाली आहे.

गोंदिया येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्रातील आठही विभागांमधील १५० व्हॉलीबॉलपटू सहभागी झाले होते. त्यापैकी १२ खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असून त्यामध्ये आयन खलील खानचा समावेश आहे.

यानंतर मध्य प्रदेशातील नरसिंहपूर येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आयन खलील खान याने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेत त्याने उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरी करत महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले.

आयनच्या या दैद्यमान यशाबद्दल संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री भीमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी श्री विश्वनाथ बजाज, श्री संदीपकुमार भोसले, सौ. प्रज्ञा महांडुळे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य श्री विकास शिवगजे यांनी त्याचे अभिनंदन केले. तसेच संस्थानच्या नावलौकिकात भर घातल्या बद्दल आयनच्या आई-वडिलांचा  श्री खलील खान व सौ. नाझेरा खान  यांच्यासह आयनचा सत्कार करण्यात आला.

आयन खलील खान यास क्रीडा प्रशिक्षक श्री कैलास शेळके व श्री राजेंद्र कोहोकडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

राहता येथे नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी विविध प्रभागांमध्ये नागरिकांच्या भेटी घेऊन संवाद साधला

राहता 
नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या निमिताने जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी शहरातील विविध प्रभागांमध्ये नागरीकांच्या भेटी घेवून  संवाद साधला.


मोठ्या कालावधी नंतर होत असलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत सध्या चांगलाच उत्साह आहे.राहाता शहरात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शना खाली महायुतीचे उमेदवार उभे आहेत.सर्व उमेदवारांच्या प्रचाराच्या निमिताने विविध प्रभागात मंत्री विखे पाटील यांनी नागरीकांशी संवाद साधला.


शहराच्या सर्वागीण विकासासाठी कुठेही निधी कमी पडू दिला नाही.शहराच्या पायाभूत सुविधा सोडविण्याला नेहमीच प्राधान्य दिले भविष्यात शहरासाठी अधिक काम करायचे आहे.राज्यात महायुती सरकारच्या माध्यमातून शहर विकासाचे निर्णय होत आहेत.शहराच्या पायाभूत सुविधांसाठी  महायुती सरकार निर्णय करीत असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

शहराच्या विकास प्रक्रीयेला गती देण्याचा प्रयत्न निरंतर सुरू आहे.जलसंपदा विभागाच्या माध्यमातून पाण्याची समस्या दूर करतानाच ,गोदावरी कालव्याच्या नूतनीकरणासाठी ४००कोटी कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.शहरासाठी जलशुध्दीकरण प्रकल्प लवकरच कार्यान्वित होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याचे काम सुरू असून,शिर्डी येथे सुरू होत असलेली औद्योगिक वसाहत निर्माण होणारे उद्योग या भागाच्या विकासप्रक्रीयेचा मोठा टप्पा असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

सोमवार, २४ नोव्हेंबर, २०२५

आकाश बोठे ची इन्स्पायार अवार्ड साठी निवड


राहता येथील रयत शिक्षण संस्थेच्या शारदा शैक्षणिक सकुलातील इयत्ता बारावी विज्ञान शाखेतील आकाश बोठे  या विद्यार्थ्यांची इन्स्पायर अवार्ड २०२३  २४ २०२४ २५ साठी राज्यस्तरावर निवड झाली आहे यामध्ये माध्यमिक विभागाचा विद्यार्थी सार्थक बोठे यांनी सहभाग घेतला होता या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनास स्पर्धेसाठी निवड झाली या विद्यार्थ्यांना शारदा सकुलाचे प्राचार्य अनिल बनसोडे यांचे प्रोत्साहन लाभले या विद्यार्थ्यांची निवड झाल्याबद्दल राहता व पंचक्रोशीतून कौतुक होत आहे

डॉ सुजय दादा विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अस्तगाव येथे चिमुकल्यांसाठी स्नेहभोजन


युवकांचे प्रेरणास्थान,लोकनेते सन्माननीय प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे,चेअरमन मा.खासदार मा.श्री सुजय दादा विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अस्तगाव येथे आज शाळेतील विद्यार्थ्यांसाठी साई साक्षी उद्योग समूह,अस्तगावचे सर्वेसर्वा दादासाहेब गवांदे व विपुल गवांदे यांच्या वतीने स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आलं होतं., सन्माननीय सुजय दादा यांनी मागील महिन्यात एकरुखे येथे एका कार्यक्रमात माझ्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी अन्नदान करावे अशी आव्हान केले होते.,या आव्हानाला प्रतिसाद देत गावचे सुजाण नागरिक,युवा उद्योजक दादाभाऊ गवांदे व विखे पाटील परिवाराचे कट्टर समर्थक विपुल गवांदे पाटील यांनी चिमुकल्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले.
 यावेळी जॉन भाऊ त्रिभुवन, वाल्मीक अण्णा गोर्डे,नंदूभाऊ जेजुरकर,आर.बी.चोळके साहेब,अशोकराव नळे,सतीश आत्रे यांची शुभेच्छापर भाषणे झाली.
 यावेळी कृष्णा सुनील वाकचौरे या मुलाच्या व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते केक कापून व विद्यार्थ्यांना मिष्टांना भोजनाचे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
 यावेळी दादासाहेब गवांदे,विपुल गवांदे,जॉन त्रिभुवन,बशीरभाई शेख, सुनीलराव चोळके,दादासाहेब लोंढे,ज्ञानेश्वर जेजुरकर,नवनाथ नळे,डॉ.सचिन गवांदे,समद शेख,साहेबराव सापते, राजेश जेजुरकर,रमेश त्रिभुवन,सागर कदम,अनिल त्रिभुवन,विठ्ठल घोडेकर आधीसह मोठ्या प्रमाणात अस्तगावकर ग्रामस्थ,विद्यार्थी मित्र व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.

अभिनेता धर्मेंद्रजी यांच्या निधनान भारतीय चित्रपट सृष्टीतील एक सुवर्णयुग थांबले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील


लोणी 
भारतीय सिनेसृष्टीतील करीश्माई आणि रसिकांच्या मनात राहीलेले  अभिनेता धर्मेद्रजी यांच्या निधनान भारतीय चित्रपट सृष्टीतील एक सुवर्णयुग थांबले असल्याची भावना जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

आपल्या शोकसंदेशात मंत्री विखे पाटील यांनी म्हणले आहे की,धर्मेद्रजी आपल्या साधेपणातील  व्यक्तिमत्वाने आणि अप्रतिम अभिनयाने लाखो रसिकांच्या मनात घर करून होते.शोलेतील धडाडीचा वीरू,अनुपमातील शांत प्रेमळ किंवा धरमवीर मधील त्यांची भूमिका तडफदार आणि तितकीच हिंदी चित्रपट सृष्टीचा वारसा बनून राहीली.बहारदार अभिनय आणि तितक्यात सहजतेने एक कलाकार म्हणून त्यांचे संवादकौशल्य तितकेच दमदार आणि कलाक्षेत्रात आपले वेगळेपण सिध्द करणारे होते.

सिनेसृष्टीतील आपल्या संपूर्ण कार्यकाळात प्रचंड मेहनत जिद्द आणि कलाकार म्हणून निष्ठेचे एक उतम उदाहरण होते.त्यांच्या निधनान सिनेसृष्टीने एक अनुभवी अभिनेता गमावला त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.

विखेंचा नवा मास्टरस्ट्रोक! ADCC बँकेत घुलेंना अध्यक्ष करून समीकरणं पालटले

विखेंचा नवा मास्टरस्ट्रोक! ADCC बँकेत घुलेंना अध्यक्ष करून समीकरणं पालटले


अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या रिक्त झालेल्या चेअरमन पदासाठी आज सोमवारी (दि.24) घेण्यात आलेल्या निवड प्रक्रियेत माजी आमदार आ. चंद्रशेखर घुले पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. सकाळी ११ वाजता जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची अधिकृत बैठक पार पडली.

यापूर्वी सकाळी ९ वाजता नगरमधील राज पॅलेस येथे संचालकांची अनौपचारिक चहापान बैठक झाल्याचे समजते. या बैठकीत अध्यक्षपदासाठी घुले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले, त्यानंतर अधिकृत बैठकीत त्यांची निवड बिनविरोध पार पडली.

या निवडीनंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची पडद्यामागील भूमिका निर्णायक ठरल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. घुले हे कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांचे सासरे असल्याने, काळे–विखे यांच्यातील सध्याचे राजकीय समन्वयदेखील या निवडीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा घटक ठरल्याचे मानले जात आहे.

चेअरमन निवडीसाठी मतदानाधिकार असलेल्या संचालकांमध्ये मोनिका राजळे, , आण्णासाहेब म्हस्के , अंबादास पिसाळ, अमोल राळेभात, आशा तापकीर, भानुदास मुरकुटे, सीताराम गायकर, अरुण तनपुरे, चंद्रशेखर घुले, राहुल जगताप, आशुतोष काळे, प्रशांत गायकवाड, अनुराधा नागवडे, अमित भांगरे, गीतांजली शेळके, माधवराव कानवडे, करण ससाणे, गणपतराव सांगळे व शंकरराव गडाख या सदस्यांचा समावेश आहे.

निवड प्रक्रियेपूर्वी अनेक संचालकांनी पुढील राजकीय समीकरणांच्या दृष्टीने विखे पाटील यांना सहकार्य राखणे आवश्यक असल्याने, घुले यांच्या समर्थनाचा कल स्पष्ट दिसत होता.

बिनविरोध निवड झाल्यानंतर आ. चंद्रशेखर घुले पाटील यांनी विश्वास व्यक्त केल्याबद्दल संचालक मंडळाचे आभार मानले, तसेच नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

शनिवार, २२ नोव्हेंबर, २०२५

राज्यात "सैनिक हो तुमच्यासाठी" उपक्रमात १ हजार ५४२ अर्ज निकाली मंत्री विखे पाटील यांच्या संकल्पनेला मिळाले यश

राज्यात  "सैनिक हो तुमच्यासाठी" उपक्रमात १ हजार ५४२ अर्ज निकाली

मंत्री विखे पाटील यांच्या 
संकल्पनेला मिळाले यश 

लोणी 


 राज्यात महसूल पंधरवडा मध्ये राबविण्यात आलेल्या "सैनिक हो तुमच्यासाठी" या उपक्रमात प्राप्त झालेल्या माजी सैनिकांच्या  १हजार ९५६ अर्जापैकी १हजार ५४२ अर्ज निकाली काढण्यात आले असून,१५माजी सैनिकांच्या  जमीन वाटप प्रकरणावर विभागाने निर्णय केला आहे.

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून राज्यात महसूल दिनाच्या निमिताने आयोजित करण्यात आलेल्या महसूल पंधरवडा मध्ये एक दिवस सैनिक हो तुमच्यासाठी या उपक्रमाचा समावेश प्राधान्याने करण्यात आला होता.यामध्ये प्राधान्याने निवृत  सैनिक तसेच शहीद जवानांच्या कुटूबियांना  महसूल विभागाशी संबंधित असलेल्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी प्रथमच असा पुढाकार घेण्यात आला होता.

राज्यातील सर्व विभागांमध्ये सैनिक हो तुमच्यासाठी उपक्रमासाठी ३८३ शिबीर आयोजित करण्यात आली होती.
 शिबीरामध्ये प्राप्त झालेल्या १हजार ९५६ अर्जावर तातडीने महसूल विभागाने कार्यवाही सुरू केली होती.संबंधित प्रकरणाचा पाठपुरावा व्यक्तिशा आपण करीत होतो.यापैकी १हजार ५४२ अर्जावर कार्यवाही होवून माजी सैनिक तसेच त्यांच्या कुटुंबियांचे प्रश्न मार्गी लागले असल्याचे समाधान मंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

अनेक सैनिकांच्या कुंटूबाचे जमीनीचे प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित होते यापैकी १५ प्रकरण निकाली लावण्यात यश आल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.माजी सैनिक किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्या उद्देशाने सैनिक हो तुमच्यासाठी उपक्रम राबविण्यात आला त्याचे यश यानिमित्ताने अधोरेखित झाले.देशासाठी सेवा करताना कौटुंबिक प्रश्नाकडे होणारे दुर्लक्ष यामुळे वर्षानुवर्ष समस्या तशाच होत्या.महसूल पंधरवड्याच्या माध्यमातून सैनिकांच्या कुंटूबियांच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी योगदान देता आल्याचे समाधान मोठे असल्याची भावना मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केली.

गुरुवार, २० नोव्हेंबर, २०२५

शब्दगंध साहित्य पुरस्कार पुस्तकं पाठवण्याचे आवाहन

शब्दगंध साहित्य पुरस्कार                                                              पुस्तकं पाठवण्याचे आवाहन

अहिल्यानगर: “शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य च्या वतीने राज्यस्तरीय वाड:मय स्पर्धा आयोजित करण्यात आली असून ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत साहित्यिकांनी आपल्या साहित्यकृती पाठवाव्यात,उत्कृष्ट साहित्यकृतीना शब्दगंध साहित्य पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे ” अशी माहिती शब्दगंध चे संस्थापक,सचिव सुनील गोसावी व अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी दिली.
      गेल्या वीस वर्षापासून शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने राज्यस्तरीय वाड:मय स्पर्धा घेण्यात येतात.यावर्षी एक जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ दरम्यान प्रकाशित झालेले कथासंग्रह, काव्यसंग्रह, लेखसंग्रह, कादंबरी, आत्मचरित्र, संशोधन ग्रंथ,ललितसंग्रह,बालवाड:मय इ प्रकारातील पुस्तकांच्या तीन प्रती,परिचय,५ रु पोस्टाची ५ तिकिटे यासह शब्दगंध साहित्यिक परिषद, फुलोरा,लक्ष्मी कॉलनी,भिस्तबाग महालाजवळ,तपोवन रोड, सावेडी अहिल्यानगर – ४१४००३ मो.क्र.९९२१००९७५० येथे पाठवाव्यात,परिक्षण झाल्या नंतर सतराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनात लेखक,कवींना  शब्दगंध साहित्य पुरस्कार देऊन मान्यवरांचे हस्ते गौरविण्यात येणार आहे.सन्मानपत्र. सन्मान चिन्ह,शाल असे पुरस्काराचे स्वरूप राहणार आहे. 
      तरी जास्तीत जास्त नवोदितांनी शब्दगंध साहित्य पुरस्कारासाठी आपली पुस्तके पाठवावेत,असे आवाहन कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडूळे,उपाध्यक्ष माजी प्राचार्य डॉ.जी.पी.ढाकणे,कार्यवाह भारत गाडेकर, प्रसिद्धीप्रमुख राजेंद्र फंड यांनी केले आहे.

तुकडा बंदी कायद्याचे उल्लंघन करून झालेल्या जमीन व्यवहारांना नियमित करण्याबाबत तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले

लोणी, 

       तुकडा बंदी कायद्याचे उल्लघन करुन, झालेल्‍या जमीन व्‍यवहारांना नियमित करण्‍याबाबत तत्‍कालिन महसूल मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी सातत्‍याने केलेल्‍या पाठपुराव्‍याला यश मिळाले  असून, तुकडाबंदी कायद्यासाठी यापुर्वी केलेल्‍या सुधारणेवर महायुती सरकारने शिक्‍कामोर्तब केले. अशा जमीनींचे व्‍यवहार आता विनामुल्‍य करण्‍याचे आदेश दिल्‍याने राज्‍यातील कोट्यावधी नागरीकांना दिलासा मिळाला आहे.

       तुकडेबंदीच्‍या झालेल्‍या बेकायदेशिर व्‍यवहारांना नियमात बसवून सामान्‍य माणसाला दिलासा देण्‍यासाठी तत्‍कालिन महसूल मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी त्‍यांच्‍या कार्यकाळात आधिका-यां समवेत सातत्‍याने बैठका घेवून याबाबतचा पाठपुरावा सुरु ठेवला होता. तुकडे बंदी कायद्यातील सुधारणेला १० ऑक्‍टोंबर २०२४ रोजी मान्‍यता देण्‍यात आली होती. सन १९४७ साली अमलात आलेल्‍या तुकडेबंदी कायद्यातील तरतुदी नूसार प्रत्‍येक जिल्‍ह्यातील प्रमाणभूत क्षेत्र ठरविण्‍यात आले होते.

मात्र या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राचे हस्‍तातंरण करण्‍यास कायद्याचे निर्बंध होते. यामुळे सर्वसामान्‍य नागरीकांच्‍या अडचणी मोठ्या प्रमाणात वाढल्‍या होत्‍या. याबाबत तत्‍कालिन महसूल मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केलेल्‍या पाठपुराव्‍या नूसार १५ ऑक्‍टोंबर २०२४ रोजी मंत्रीमंडळाने मान्‍य केलेल्‍या सुधारणेला राज्‍यपालांनीही समंती दिल्‍यानंतर त्‍यानंतर अध्‍यादेशही काढण्‍यात आला होता. या विधेयकाला दोन्‍हीही सभागृहांनी मान्‍यता दिल्‍यानंतर कायद्यातील सुधारणेचा मार्ग मोकळा झाला होता.

तुकडा बंदीचे व्‍यवहार नियमित करण्‍यासाठी दंडाची रक्‍कम भरण्‍यासही नागरीक पुढे येत नसल्‍याने आता शासनाने कोणतेही मुल्‍य न आकारता हे व्‍यवहार नियमित करण्‍याचा निर्णय महायुती सरकारने घेतल्‍याने याचा मोठा दिलासा नागरीकांना मिळणार असून, अशा पध्‍दतीने गुंठेवारीचे व्‍यवहार केलेल्‍या नागरीकांना जमीनींचे व्‍यवहार आता नियमानूकुल करण्‍यास मोठी मदत होईल. यामाध्‍ये प्रामुख्‍याने खरेदीचा फेरफार रद्द झाला असेल तर, पुन्‍हा तपासून मंजुर केला जाईल. तर तुकडेबंदी कायद्याविरुध्‍द व्‍यवहार असा शेरा सातबारावर असले तर तोही आता काढून टाकण्‍यात येणार आहे.

बुधवार, १९ नोव्हेंबर, २०२५

श्री साईबाबा संस्थानच्या इंग्लिश मिडीयम स्कूलच्या कु. चैत्राली विलास सिनगर हिच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे तिची राज्यस्तरीय Inspire MANAK प्रदर्शन (गोंदिया) येथे निवड झाली आहे.

श्री साईबाबा संस्थानच्या इंग्लिश मिडीयम स्कूलच्या कु. चैत्राली विलास सिनगर हिच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे तिची राज्यस्तरीय Inspire MANAK प्रदर्शन (गोंदिया) येथे निवड झाली आहे.


शिर्डी 

भारत सरकार विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, नवी दिल्ली यांच्या वतीने दिनांक १७ व १८ नोव्हेंबर २०२५ रोजी दा.ह. घाडगे पाटील विद्यालय, त्रिमूर्ती शैक्षणिक व सांस्कृतिक संकुल, त्रिमूर्तीनगर, नेवासा फाटा, ता. नेवासा येथे  Inspire MANAK जिल्हास्तरीय प्रदर्शन (DLEPC) आयोजन करण्यात आले होते,त्यामध्ये  श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलकडील आठवीची विद्यार्थिनी कु. चैत्राली विलास सिनगर हिने आपली विज्ञाननिष्ठ कल्पकता आणि अभिनव प्रकल्प सादरीकरण करून उल्लेखनीय कामगिरी नोंदवली.
कु. चैत्रालीच्या या यशामध्ये शाळेचे प्राचार्य आसिफ तांबोळी, मुख्याध्यापिका सौ. शिल्पा पुजारी, तसेच विज्ञान विषयांच्या शिक्षकांचे मार्गदर्शन, पाठबळ आणि प्रोत्साहन मोलाचे ठरले.
या विशेष यशाबद्दल श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.), उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भिमराज दराडे, प्र. प्रशासकीय अधिकारी श्री. विश्वनाथ बजाज तसेच शाळेतील सर्व शिक्षकांनी कु. चैत्रालीचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून तिच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

मंगळवार, १८ नोव्हेंबर, २०२५

लोहगाव येथील सुमनबाई भाऊसाहेब चेचरे यांचे निधन

लोहगाव 

राहाता तालुक्यातील लोहगाव येथील सुमनबाई भाऊसाहेब चेचरे (वय ६७) यांचे नुकतेच निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती.दोन मुले.एक मुलगी.सुना . नातवंडे.नाती.जावई. असा मोठा परिवार आहे.

,लोहगाव तंटामुक्ती उपाध्यक्ष . भाऊसाहेब विश्राम चेचरे पा.यांच्या पत्नी व गुरुदत्त सहकारी दूध उत्पादक संस्थेचे विद्यमान चेअरमन 
शरद भाऊसाहेब चेचरे पा. व श्री. यशवंत भाऊसाहेब चेचरे पा.मीना अनिल गागरे पा. यांच्या मातोश्री होत.

त्यांच्यावर राहात्या घराजवळ अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी सामाजिक राजकीय सांस्कृतिक आध्यात्मिक क्षेत्राबरोबर मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राज्याच्या जलसंपदा विभागाचा गौरव! मंत्री विखे पाटील यांनी केला पुरस्काराचा स्विकार

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राज्याच्या जलसंपदा विभागाचा गौरव!

मंत्री विखे पाटील यांनी 
केला पुरस्काराचा स्विकार 


पुरस्काराने अधिक काम 
करण्यासाठी पाठबळ-डाॅ विखे पाटील 


केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने राज्याच्या जलसंपदा विभागाला "बेस्ट स्टेट कॅटेगरी २०२४ " मध्ये प्रथम क्रमाकांच्या मानाच्या पुरस्काराचे वितरण दिल्ली मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले.राज्याचे जलसंपदा तथा अहील्यानगर जिल्ह्याचे पालक मंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुरस्काराचा स्विकार केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे २०२४साली जलसंपदा विभागाची जबाबदारी होती.त्यांच्या कार्यकाळात विभागाने राज्याच्या जलव्यवस्थापन आणि सिंचन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्याचा सन्मान प्राप्त झाला आहे.

जलसंपदा विभागाच्या यशात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून होत असलेले नियोजन तसेच अतिशय पारदर्शकता,तांत्रिक सुधारणा आणि निर्धारीत वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यावर विशेष भर दिला आहे.धरण सुरक्षा,जलसंवर्धन सिंचन प्रकल्पांना गती आणि जलस्त्रोतांचा योग्य वापर यासर्व कामासाठी घेतलेल्या निर्णयाबद्दल महाराष्ट्राला केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने
सन्मानित केल्याचे डॉ विखे पाटील म्हणाले.

महायुती सरकाच्या माध्यमातून सिंचन सुधारणा कार्यक्रमात सर्व प्रकल्पांची काम निर्धारीत वेळेत पूर्ण करण्यासाठी विभाग प्रयत्न करीत असून,विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांक्षी आशा नदीजोड प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजिदादा पवार जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्यासह मंत्रीमंडळातील सर्व सहकारी मंत्र्याच्या  सहकार्याने राज्यातील सिंचनाचे सर्व प्रकल्प निर्धारीत वेळेत पूर्ण करण्यासाठी आजच्या पुरस्काराचे मोठे पाठबळ असल्याची प्रतिक्रीया मंत्री विखे यांनी व्यक्त केली.
विभागातील सर्व अधिकारी अभियंते आणि कर्मचारी यांचेही मोठे योगदान पुरस्कार मिळ्ण्यात असल्याचा उल्लेख मंत्री विखे पाटील यांनी आवर्जून केला.

शनिवार, १५ नोव्हेंबर, २०२५

सकारात्मक भूमिकेबद्दल संस्थान चे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचे स्वागत केले

शिर्डी :


श्री साईबाबा व श्री साईबाबा संस्थान विषयी विविध समाजमाध्यमांतून आक्षेपार्ह विधाने करणारे अजय गौतम यांनी आज राहाता न्यायालयात हजर राहून आपली चूक मान्य केली आहे. त्यांनी न्यायालयासमोर नमूद केले की, “श्री साईबाबा व श्री साईबाबा संस्थानबाबत असलेले गैरसमज माझे दूर झाले असून, यापुढे मी कोणतेही चुकीचे वक्तव्य, मुलाखत, चर्चा किंवा भाष्य करणार नाही.”
सन २०२३ मध्ये श्री साईबाबांविषयी करण्यात आलेल्या आक्षेपार्ह विधानांच्या पार्श्वभूमीवर, श्री साईबाबा संस्थानने अशा प्रकारची विधाने करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध राहाता येथील न्यायालयात कायदेशीर दावा दाखल केला होता, ज्यामध्ये अजय गौतम यांचा समावेश होता.
दरम्यानच्या काळात त्यांचे गैरसमज दूर झाल्याने, आज त्यांनी न्यायालयात स्पष्ट केले की त्यांच्या पूर्वीच्या विधानांचा आधार हा अपुऱ्या माहितीतून झालेल्या गैरसमजांवर होता. त्यानंतर त्यांनी श्री साईबाबांच्या मध्यान्ह आरतीसाठी उपस्थित राहून दर्शन घेतले.
दर्शनानंतर आयोजित पत्रकार परिषदेत अजय गौतम यांनी आपल्या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त करत सांगितले की, “मी आता बाबांच्या प्रचार–प्रसारासाठी लवकरच एक पुस्तक लिहिणार आहे.”
या सकारात्मक भूमिकेबद्दल संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. गोरक्ष गाडिलकर (भा.प्र.से.) यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांनी सांगितले की,
“ज्यांचे अजूनही काही गैरसमज असतील त्यांनी थेट श्री साईबाबा संस्थानशी संपर्क साधावा; अन्यथा अशा बदनामी करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरूच राहील. या संपूर्ण प्रक्रियेत संस्थानचे माजी विश्वस्त श्री मोहन जयकर व शिर्डी ग्रामस्‍थ कमलाकर कोते यांनी समन्वय साधला.




शुक्रवार, १४ नोव्हेंबर, २०२५

वोट चोरीची आरोप करणाऱ्यांना या निवडणुकीने धोबीपछाड केली- मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

संगमनेर    

भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांच्या युतीला बिहार मध्ये मिळालेला ऐतिहासिक विजय पाहाता  विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला देशातील जनता थारा देत नाही हेच सिध्द झाले आहे.वोट चोरीचे आरोप करणार्यांना या निवडणुकीने धोबीपछाड केले असल्याची प्रतिक्रीया जलसंपदा तथा पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

बिहाराच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासह सर्व मित्र पक्षांच्या नेत्याचे अभिनंदन करून मंत्री विखे पाटील म्हणाले की,बिहारच्या जनतेन खोट्या प्रचाराला बळी न विकास प्रक्रीयेला साथ दिली.अतिशय खालच्या स्तरावर जावून काॅग्रेस आणि मित्र पक्षांच्या नेत्यांनी प्रचार केला.प्रधानमंत्र्याच्या मातोश्रीबद्दल बोलले गेले हे अतिशय दुर्दैवी होते.

निवडणुकी पुर्वी वोट चोरीच्या नावाखाली जाणीवपुर्वक दिशाभूल केली गेली.संविधानिक संस्थावर आरोप करण्यात आले.आपल्या राज्यातील जाणत्या राजांसह काही नेते  त्यात सहभागी झाले.विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला बिहारची जनता कुठेही बळी पडली नसल्याचे विखे पाटील म्हणाले.

बिहारच्या निवडणुकीत काॅग्रेस पक्षाची झालेली वाताहात पाहाता  आता परदेशात जावून देशाच्या लोकशाही व्यवस्थेवर टिका करण्यापेक्षा स्वताच्या पक्षाच्या अस्तित्वासाठी काम  करण्याचा टोला मंत्री विखे पाटील यांनी लगावला.

गुरुवार, १३ नोव्हेंबर, २०२५

मनोमय हीलिंग हार्ट फाउंडेशनकडून राहाता येथे रोजगारासाठी नव्या संधी — प्लेसमेंट व रिक्रूटमेंट सेवा सुरू

मनोमय हीलिंग हार्ट फाउंडेशनकडून राहाता येथे रोजगारासाठी नव्या संधी — प्लेसमेंट व रिक्रूटमेंट सेवा सुरू


राहाता  –
 समाजसेवा, मानसिक आरोग्य संवर्धन आणि ग्रामीण विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारी मनोमय हीलिंग हार्ट फाउंडेशन संस्था आता रोजगार आणि करिअर विकास क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण उपक्रम घेऊन आली आहे. फाउंडेशनने राहाता येथे अधिकृतपणे प्लेसमेंट आणि रिक्रूटमेंट सेवा सुरू केली असून, या माध्यमातून स्थानिक युवक-युवतींना आणि महिलांना मेडिकल, औद्योगिक, शैक्षणिक तसेच विविध व्यावसायिक क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याचा उद्देश ठेवला आहे.


🌱 उद्देश – प्रत्येक तरुणाला रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणणे
आजच्या काळात शिक्षण पूर्ण केल्यानंतरही अनेक तरुणांना योग्य नोकरी मिळत नाही. ग्रामीण भागात औद्योगिक संपर्क, मार्गदर्शन आणि करिअर नियोजनाचा अभाव जाणवतो. या पार्श्वभूमीवर मनोमय हीलिंग हार्ट फाउंडेशनने रोजगार निर्मिती व करिअर विकासासाठी हा उपक्रम सुरू केला आहे.
या सेवेमार्फत फाउंडेशनचे ध्येय स्थानिक युवकांना योग्य क्षेत्रात रोजगार मिळवून देणे, त्यांचे कौशल्य विकसित करणे आणि त्यांना आत्मनिर्भरतेकडे नेणे हे आहे.
🏥 मेडिकल, औद्योगिक, शैक्षणिक आणि विविध क्षेत्रांमध्ये संधी
ही सेवा केवळ एका क्षेत्रापुरती मर्यादित नसून विविध क्षेत्रांमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे, जसे की:
🏥 मेडिकल आणि आरोग्य क्षेत्र – हॉस्पिटल, क्लिनिक, डायग्नॉस्टिक सेंटर, नर्सिंग व पॅरामेडिकल संधी.
🏭 औद्योगिक क्षेत्र – उत्पादन, गुणवत्ता नियंत्रण, मशिन ऑपरेशन, आणि तांत्रिक कामे.
🎓 शैक्षणिक क्षेत्र – शिक्षक, प्रशिक्षक, काउंसिलर, आणि प्रशासनिक पदे.
💼 सेवा व व्यावसायिक क्षेत्र – बँकिंग, सेल्स, मार्केटिंग, कार्यालयीन सहाय्यक, इत्यादी.
🤝 स्थानिक उद्योग आणि संस्थांशी जोडणी

 फाउंडेशनने अहमदनगर जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील विविध कंपन्या, उद्योग, रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि व्यावसायिक संघटना यांच्याशी संपर्क साधून एक मजबूत नेटवर्क तयार केले आहे.
या नेटवर्कद्वारे उमेदवारांना थेट मुलाखती, नोकरी संदर्भ सेवा आणि ऑन-द-जॉब ट्रेनिंगच्या संधी मिळणार आहेत.
संस्थेच्या प्लेसमेंट विभागाकडून दर महिन्याला रोजगार मेळावे, इंटरव्ह्यू कॅम्प, आणि जॉब नोटिफिकेशन्स प्रकाशित केल्या जाणार आहेत.
🧭 कौशल्यविकास आणि करिअर मार्गदर्शन उपक्रम
रोजगार उपलब्ध करून देणे हेच नव्हे, तर उमेदवारांना त्यासाठी सक्षम बनवणे हेही फाउंडेशनचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी खालील उपक्रम राबविण्यात येतील –
🎯 कौशल्यविकास कार्यशाळा – संगणक प्रशिक्षण, संवादकौशल्य, इंग्रजी भाषेचे प्रशिक्षण.
💡 करिअर मार्गदर्शन सत्रे – योग्य क्षेत्र निवडण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन.
🌼 व्यक्तिमत्त्व विकास व आत्मविश्वास वाढविणारी सत्रे.
🧩 रोजगार मेळावे आणि थेट भरती उपक्रम.
💬 संस्थेचे मत
“आमचा उद्देश केवळ रोजगार मिळवून देण्याचा नाही, तर प्रत्येक युवक आणि महिलेला आत्मनिर्भर बनवण्याचा आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक तरुणात अफाट क्षमता आहे – फक्त योग्य मार्गदर्शन आणि संधीची गरज आहे,”
असे डॉ. पंकज येलम, संस्थापक आणि अध्यक्ष, मनोमय हीलिंग हार्ट फाउंडेशन, यांनी सांगितले.
डॉ. येलम यांच्या नेतृत्वाखाली फाउंडेशनने आतापर्यंत मानसिक आरोग्य, सामाजिक कल्याण आणि शैक्षणिक उपक्रमांत उल्लेखनीय कामगिरी केली असून, हा रोजगार प्रकल्प त्याच समाजहितकारी कार्याचा पुढचा टप्पा आहे.

🌼 राहाता परिसरासाठी एक नवा अध्याय
राहाता परिसरात प्रथमच अशा प्रकारची बहुविभागीय प्लेसमेंट सेवा सुरू होत आहे. या सेवेच्या माध्यमातून स्थानिक युवकांना त्यांच्या आवडीनुसार आणि पात्रतेनुसार मेडिकल, औद्योगिक, शैक्षणिक तसेच अन्य क्षेत्रांमध्ये करिअर घडविण्याची संधी मिळेल. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील युवकांचे स्थलांतर कमी होईल आणि स्थानिक अर्थव्यवस्था सक्षम होईल.
📞 संपर्क माहिती
मनोमय हीलिंग हार्ट फाउंडेशन, राहाता (अहिल्यानगर)
👨‍⚕️ संपर्क व्यक्ती: डॉ. पंकज येलम
📞 मोबाईल: +91 9699933690
✉️ ईमेल: drpankajyelam@gmail.com
🌐 वेबसाइट: www.manomayhealingheartfoundation.com

बुधवार, १२ नोव्हेंबर, २०२५

गोदावरी कालव्याच्या 65 ते 107 मधील वितरण व्यवस्थेच्या कामाचा शुभारंभ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला

राहाता 
गोदावरी कालव्यांच्या नूतनीकरणासाठी ४००कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून,निर्धारीत वेळेत काम पूर्ण करून आवर्तनाची व्यवस्था अधिक मजबूत करण्याचे धोरण महायुती सरकारने घेतले आहे.गोदावरीचे कालव्याचे नूतनीकरण करण्याच्या दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती होत असल्याचे समाधान  जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.

गोदावरी कालव्यांच्या ६५ते १०७ मधील वितरण व्यवस्थेच्या कामाचा शुभारंभ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला.माजी मंत्री अण्णासाहेब मस्के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास अधिक्षक अभियंता राजेश गोवर्धने कार्यकारी अभियंता सोनल शहाणे उपअभियंता विवेक लव्हाट डॉ धनंजय धनवटे, काळे कारखान्याचे व्हा चेअरमन प्रविण शिंदे बाबासाहेब कोते डॉ संपतराव शेळके सौ.रंजना लहारे सौ.कविता लहारे,भाजपाच्या महीला जिल्हाध्यक्षा सौ.शोभा घोरपडे किसान मोर्चाचे बाळासाहेब भोरकडे उपस्थित होते.

आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील  म्हणाले की,शंभर वर्ष पूर्ण झालेल्या गोदावरी कालव्यांना यापुर्वी कोणालाही  निधी उपलब्ध करून द्यावासा वाटला नाही.राज्यात महायुतीची सता आल्यानंतर सिंचन प्रकल्पांच्या कामास तसेच कालव्याच्या सुधारणेच्या कामास निधी देण्याची तरतूद प्राधान्याने झाली.कारण ही सर्व जुनी व्यवस्था बदलून लाभक्षेत्राला दुष्काळमुक्त करण्याचे स्वप्न डॉ बाळासाहेब विखे पाटील आणि स्व.गणपतराव देशमुख यांनी पाहीले.त्याची पूर्तता म्हणजे आजचा कार्यक्रम असल्याचे त्यांनी सांगितले.

कुकडी कालव्यांचा उल्लेख करून मंत्री विखे म्हणाले की, जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना कधीही निधी मिळाला नाही.अनेकजण फक्त राजकारणासाठी आले.पण या जिल्ह्याला मदत करण्याचे दायित्व जाणते राजे दाखवू शकले नसल्याची खंत व्यक्त करतानाच,राज्यातील सहकारी साखर कारखान्याचे खासगीकरण रोखण्याचा निर्णय आपण पुढाकार घेतल्यामुळे थांबला.त्याचा परीणाम म्हणून गणेश सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा राहीला.विखे पाटील कारखान्याने तोटा सहन करून तो चालवला.आता कारखाना कोणीही चालवावा, पण भूमिका घेतली नसती तर शेतकर्यांची मालकी राहीली नसती.

राज्यात महायुतीचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे आहे.आपतीच्या काळात ३२हजार कोटी रुपयांच्या मदतीची केवळ घोषणा नाही तर प्रत्यक्ष अंमलबजावणी केली.राहता तालुक्यात ४२ कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना झाली असून वाकडी संभाजीनगर आणि धनगरवाडी या गावातील तीन हजार शेतकऱ्यांना १कोटी ८९लाख रुपये आणि रब्बी हंगामचे अनुदान २कोटी ५०लाख मंजूर झाले.जलजीवन योजनेसाठी २९कोटी रूपयांचा निधी देण्यात आला असून ग्रामपंचायत कोणाकडे याचा कोणताही राजकीय विचार न करता शेती महामंडळाची ११एकर जमीन योजनेसाठी दिल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी आपल्या भाषणात यापुर्वी मंत्री असताना या कालव्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते.मात्र मध्यतंरीच्या काळात निधी उपलब्ध न झाल्याने कालव्याची दुरावस्था झाली.ना.विखे पाटील यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व सिंचन सुधारणेच्या बाबतीत होणारे काम महत्वपूर्ण असून पुढील अनेक वर्षाच्या वाटचालीच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारे असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने विभागाचा गौरव म्हणजे दुष्काळ मुक्त महाराष्ट्राच्या संकल्पनेला मिळालेले पाठबळ

राहता 

केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने राज्याच्या  जलसंपदा विभागाला 
"बेस्ट स्टेट कॅटेगरी २०२४ " मध्ये प्रथम क्रमांकांच्या मानाच्या पुरस्काराने केलेला गौरव अभिमास्पद असून,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या संकल्पनेला पाठबळ देणारा गौरव असल्याची प्रतिक्रीया जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

माध्यमांशी बोलतांना मंत्री विखे म्हणाले की,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे २०२४साली जलसंपदा विभागाची जबाबदारी होती.त्यांच्या कार्यकाळात विभागाने राज्याच्या जलव्यवस्थापन आणि सिंचन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्याला हा सन्मान प्राप्त झाला आहे.

जलसंपदा विभागाच्या यशात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून होत असलेले नियोजन तसेच अतिशय पारदर्शकता,तांत्रिक सुधारणा आणि निर्धारीत वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यावर विशेष भर दिला आहे.धरण सुरक्षा,जलसंवर्धन सिंचन प्रकल्पांना गती आणि जलस्त्रोतांचा योग्य वापर यासर्व कामासाठी घेतलेल्या निर्णयाचे प्रतिबिंब या पुरस्कारा मागे असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

महायुती सरकाच्या माध्यमातून सिंचन सुधारणा कार्यक्रमात सर्व प्रकल्पांची काम निर्धारीत वेळेत पूर्ण करण्यासाठी विभाग प्रयत्न करीत असून,विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी आशा नदीजोड प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने विभागाचा गौरव म्हणजे दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या संकल्पनेला मिळालेले पाठबळ असून,विभागातील सर्व अधिकारी अभियंते आणि कर्मचारी यांचेही मोठे योगदान पुरस्कार मिळ्ण्यात असल्याचा उल्लेख मंत्री विखे पाटील यांनी आवर्जून केला.

मंगळवार, ११ नोव्हेंबर, २०२५

साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्यावतीने सन 2026 या वर्षासाठीच्या.. श्री साईबाबा दैनंदिनी व दिनदर्शिकेचे प्रकाशन संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते करण्यात आले

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी यांच्या वतीने सन २०२६ या वर्षासाठीच्या श्री साईबाबा दैनंदिनी व दिनदर्शिकेचे प्रकाशन संस्थानचे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडिलकर (भा.प्र.से.) यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी संस्थानचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी श्री भिमराज दराडे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
दरवर्षीप्रमाणे साईभक्तांच्या मागणीनुसार मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलुगू, तमिळ या भाषांमध्ये श्री साईबाबा दैनंदिनी आणि दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आल्या आहेत. सन २०२६ साठीची ही आवृत्ती आकर्षक, दर्जेदार असून श्री साईबाबांच्या पवित्र दर्शनस्थळांचे छायाचित्रे व प्रेरणादायी विचारांचा समावेश यात करण्यात आला आहे.


ही साई दैनंदिनी व दिनदर्शिका संस्थानच्या प्रकाशन विभागामार्फत विक्रीसाठी उपलब्ध असून तसेच संस्थानच्या संकेतस्थळावरून (online.sai.org.in) ऑनलाईन खरेदी करता येईल. देशभरातील साईभक्तांसाठी पोस्टाद्वारे पाठविण्याची सोय देखील उपलब्ध आहे. यामध्ये, श्री साईबाबा दैनंदिनी (मोठी) रुपये ९०, श्री साईबाबा दैनंदिनी (लहान) रुपये १५/-, एक पानाचे कॅलेंडर (मोठे) रुपये २०/-, वॉल कॅलेंडर (६ पाने) रुपये २०/-, डेस्क कॅलेंडर (७ पाने) रुपये ४०/-,कार कॅलेंडर (७ पाने) रुपये ०५/-, छोटा डेस्क कॅलेंडर (१८५ पाने) रुपये ७५/-, डिलक्स वॉल कॅलेंडर (८ पाने) रुपये २१०/- आदी समावेश आहे. 
तरी इच्छुक साईभक्तांनी या सुविधेचा लाभ घ्यावा व अधिक माहितीसाठी संस्थानचे संकेतस्थळ www.sai.org.in अथवा online.sai.org.in येथे भेट द्यावी असे अवाहन संस्‍थानच्‍या वतीने करण्‍यात आले आहे.

रविवार, ९ नोव्हेंबर, २०२५

अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 14 72 कोटी रुपयाची मदत मिळवून दिल्याचे सांगितले


राहाता 
 
आमचा डीएनए शेतकऱ्यांचा आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेण्याचा प्रश्नच नाही.माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून टिका करणे सोपे आहे.मात्र उध्दव ठाकरेनी शेतकऱ्यांसाठी एकतरी कारखाना किंवा उद्योग उभारला का ॽ आशा शब्दात जलसंपदा तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला.

माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की,ग्रामपंचायत आणि सोसायटी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझे वक्तव्य होते.वर्षानुवर्ष ग्रामीण भागात कर्ज घेवून निवडणुका लढवल्या जातात.घेतलेल्या कर्जाची कोणतीही उत्पादकता होत नाही.यातून तेच पुन्हा कर्जबाजारी होतात.मात्र वक्तव्याचा अर्धाच भाग दाखवून मला शेतकरी विरोधी ठरवल्याच्या मोठ्या वेदना झाल्या.माझ्या चाळीस वर्षाच्या सार्वजनिक जीवनात कधीही शेतकर्याच्या विरोधात माझी भूमिका किंवा वक्तव्य नाही.राज्यात कृषी मंत्री असताना सुरू केलेल्या असंख्य योजनांची आठवण आणि  लाभ आजही शेतकर्याना मिळत असल्याचे सभाधान असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात अतिवृष्टीने नूकसान झालेल्या शेतकर्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ३२हजार कोटींचे पॅकेज नुसते जाहीर केले नाही तर त्याची अंमलबजावणी सुरू झाली.अहील्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १४७२ कोटी रुपयांची मदत मिळवून दिल्याचे त्यांनी सांगितले.

माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या टिकेचा समाचार घेताना मंत्री विखे पाटील म्हणाले की,माझ्या विधानाचा आणि कारखान्याचा काय संबंध आमचा कारखाना सुरू होवून ७५ वर्ष झाली.उध्दवजीनी एखादा तरी कारखाना सुरू केला  किंवा चालवून दाखवला काॽटिका करणे सोपो आहे.शेतकरी हिताचा एखादा उद्योग किंवा  किमान बंद पडलेला कारखाना चालवायला घेवून दाखवावा असा टोला लगावून "उचलली जीभ लावली टाळ्याला" एवढेच त्यांचे काम आहे.

अडीच वर्ष राज्यात मुख्यमंत्री म्हणून त्यांना संधी मिळाली पण एकही शेतकरी हिताचा निर्णय त्यांनी घेतला नाही.मराठवाड्यात जावून हेक्टरी ५०हजार कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली होती त्याचा सोयीस्कर विसर त्यांना पडला.

संघाच्या माध्यमातून शिवसेना संपविण्याच्या झालेल्या आरोपांवर बोलतांना मंत्री विखे पाटील यांनी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले त्यांना भाजपाचे पाठबळ होते हे जगजाहीर आहे.आता किती दिवस तुम्ही शिळ्या कढीला उत आणणार आहात तुमच्याकडे तुमच सांगण्यासाठी काहीच राहील नाही.त्यांच्या घरावर कोण घिरट्या घालतय मला माहीत नाही,पण उध्दव ठाकरे स्वताभोवती घिरट्या घेत असावेत आशा शब्दात त्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला.

या राज्यातील शेतकर्याची उत्पादकता वाढविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यामातून प्रयत्न होत आहे.यापुर्वी वाढवलेल्या हमीभावाच्या निर्णयाचा मोठा लाभ शेतकऱ्यांना झाला.प्राकृतिक शेतीला प्राधान्य दिले जात असून महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही देतानाच जून २०२६ मध्ये कर्जमाफी करण्याच्या आश्वासनाची पूर्तता निश्चित होईल याची काळजी बाळासाहेब थोरातांनी करू नये, त्यांनाच कोणी वाली राहीला नसल्याची मिश्कील टिपणी त्यांनी  सरकावर केलेल्या  आरोपांवर केली.

शनिवार, ८ नोव्हेंबर, २०२५

राहाता येथील डॉक्टर कानडे हॉस्पिटल येथे 5 नोव्हेंबर पासून महिलांसाठी 15 दिवसाचे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे


राहाता 
अनियमित जीवनशैली आणि आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष यामुळे महिलांना भेडसावणाऱ्या विविध आजारांवर वेळीच निदान आणि उपचार मिळावा या उद्देशाने, डॉ. कानडे हॉस्पिटल येथे ५ नोव्हेंबरपासून महिलांसाठी १५ दिवसांचे मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात निदान झालेल्या रुग्णांवर अल्पदरात शस्त्रक्रिया करण्याची सुविधा देखील उपलब्ध करण्यात आली आहे.
स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. दत्ता कानडे आणि भूलतज्ज्ञ डॉ. स्वाती कानडे यांनी महिलांना या शिबिराचा लाभ
घेण्याचे आवाहन केले आहे. डॉ. कानडे म्हणाले, आर्थिक परिस्थिती, वैद्यकीय गैरसमज, निष्काळजीपणा आणि मनातील भीती यामुळे अनेक महिला त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात,  या शिबिराचा उद्देश सर्वसामान्य घरातील महिलांना मोफत आरोग्य तपासणीचा
फायदा मिळावा हा आहे. शिबिरात येणाऱ्या महिला रुग्णांना विविध आजारांसंबंधी अचूक निदान व मार्गदर्शन केले जाईल. तपासणीनंतर ज्या महिलांना गर्भपिशवी शस्त्रक्रिया करण्याची गरज भासेल, त्यांच्यासाठी ही शस्त्रक्रिया अगदी अल्प दरात करण्याची सुविधा करण्यात आली आहे. डॉ. दत्ता कानडे आणि डॉ. स्वाती कानडे यांनी राहाता परिसरातील जास्तीत जास्त महिलांनी या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये सहभागी होऊन आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले

शुक्रवार, ७ नोव्हेंबर, २०२५

श्री साईबाबा संस्थान शिर्डी यांच्यावतीने भक्तिमय आणि अध्यात्मिक वातावरणात संगीतमय श्रीमद् भागवत कथा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले


श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी यांच्या वतीने भक्तीमय आणि आध्यात्मिक वातावरणात संगीतमय श्रीमद्‌भागवत कथा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम ह.भ.प. भागवताचार्य सौ. भक्ती दीदी सोमनाथ देवकर (आळंदी, पुणे) यांच्या सुमधुर आणि भावपूर्ण वाणीमधून संपन्न होणार आहे.

📅 कालावधी: शनिवार, दि. ०८ नोव्हेंबर २०२५ ते शुक्रवार, दि. १४ नोव्हेंबर २०२५
⏰ वेळ: दुपारी २.०० ते सायं. ५.००
📍 स्थळ: श्रींचे समाधी मंदिर शताब्दी मंडप (१६ गुंठे), शिर्डी

या कालावधीत सौ. भक्ती दीदी यांच्या सुमधुर वाणीमधून मराठी भाषेत श्रीमद्‌भागवत कथा सादर केली जाणार असून, भक्तांना अध्यात्म, भक्ती आणि संस्कार यांचा अमृतानुभव घेण्याची ही एक अनोखी संधी आहे.

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेच्या वतीने सर्व साईभक्त व शिर्डी व परिसरातील ग्रामस्थांना या कार्यक्रमास उपस्थित राहून कथेमधील दिव्य संदेशांचे श्रवण करण्याचे आवाहन करण्यात येत 
आहे.

जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नातून लोणी बुद्रुक येथे 1 कोटी 71 लाख रुपये खर्चाच्या शॉपिंग कॉम्प्लेक्सचा भूमिपूजन शुभारंभ डॉ सुजय विखे पाटील यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला

लोणी 
जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून लोणी बुद्रुक येथे १ कोटी ७१ लाख रुपये खर्चाच्या भव्य शॉपिंग कॉम्प्लेक्सचा भूमिपूजन समारंभ माजी खासदार तथा युवानेते डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. 
यावेळी बाजारतळ  मंडईसाठी पत्राशेड व प्रसाधनगृह (१ कोटी ४० लाख रुपये), सांडपाणी प्रकल्पाचे आस्थापिकरण (१ कोटी १२ लाख रुपये), तसेच गोगलगाव घनकचरा प्रकल्प येथील पशुदाहिनी (१ कोटी रुपये) या विकासकामांचेही भूमिपूजन पार पडले. त्याचप्रमाणे लोणी मटन मार्केट येथील ५० लाख रुपये खर्चाच्या पशुदाहिनीचे लोकार्पण देखील युवानेते डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. हा कार्यक्रम कृषी उत्पन्न बाजार समिती राहाताचे सभापती ज्ञानेश्वर आबा गोंदकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. 


यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनी व मार्केट गाळेधारकांच्या वतीने डॉ. सुजय विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. संतोष गोरडे पाटील यांनी प्रास्ताविक भाषणात नामदार राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या चिकन-मटन मार्केटची माहिती दिली. या मार्केटमध्ये ३४ गाळ्यांची निर्मिती करण्यात आली असून यासाठी ६० लाख रुपये खर्च आला आहे. या मार्केटमध्ये स्वच्छता टिकून राहावी यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत, ज्यात अंदाजे एक कोटी रुपये खर्चाचा एसटीपी प्लांट मंजूर करण्यात आला आहे, ज्यामुळे अशुद्ध पाणी शुद्ध करून ड्रेनेजमध्ये सोडले जाईल. तसेच अंदाजे ३६ लाख रुपये किमतीची इन्सिनेरेटर मशीन उपलब्ध करण्यात आली आहे, ज्याद्वारे वेस्ट मटेरियलचे विघटन करण्यात येणार आहे.

लोणी बुद्रुक येथे झालेल्या या शॉपिंग कॉम्प्लेक्स, मटन मार्केट व विविध विकासकामांच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यात बोलताना डॉ. विखे पाटील म्हणाले की, दर पाडव्याच्या बैठकीत आपण चर्चा केलेल्या प्रत्येक प्रश्नाचं आज समाधान झालं आहे. शॉपिंग कॉम्प्लेक्स, मटन मार्केट, सांडपाणी प्रकल्प, घनकचरा प्रकल्प ही सगळी कामं आज प्रत्यक्षात उतरली आहेत. हे केवळ विकासकाम नाही, तर आपल्या गावाच्या एकतेचं आणि विश्वासाचं प्रतीक आहे. 

ते पुढे म्हणाले, "गावासाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांची आणि अध्यक्ष मॅडमची अंतर्मनातून इच्छा होती की ही सगळी कामं व्हावीत, आणि आज ती पूर्ण होत आहेत. जे गावांनी मागितलं, ते आज देण्यामध्ये आपण यशस्वी झालो." 

कृषी उत्पन्न बाजार समिती राहाता अंतर्गत मटन मार्केटचे लोकार्पण आणि शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान डॉ. सुजय दादांनी ग्रामस्थांच्या सहकार्याचे विशेष कौतुक करताना म्हटलं की, शॉपिंग कॉम्प्लेक्स स्थलांतर करताना एकाही ग्रामस्थाने विरोध केला नाही, उलट सर्वांनी एकमताने सहकार्य दिलं. हा विश्वासच माझी ताकद आहे. तो विश्वास कधी तुटू देणार नाही. ते म्हणाले की, आज लोणी बुद्रुक आणि लोणी खुर्द ही गावं महाराष्ट्रातील प्रगतशील ग्रामपंचायतींचं उदाहरण ठरली आहेत. राजकारणात पदं येतात-जातात, पण दिलेला शब्द पाळणं हीच माझी खरी जबाबदारी आहे. पुढच्या काळात लोणी गाव हे शहराला टक्कर देईल आणि बाळासाहेब विखे पाटील, नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि अध्यक्ष मॅडम यांनी पाहिलेलं स्वप्न आपण मिळून पूर्ण करू. 

यावेळी त्यांनी बाजार समितीच्या संचालकांचे आणि सभापतींचे विशेष आभार मानत, बाजारातील स्वच्छता आणि पारदर्शक व्यवहारासाठी सर्वांनी जबाबदारीने काम करावे, असे आवाहन केले. या कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समिती राहाताचे सभापती ज्ञानेश्वर आबा गोंदकर, ट्रॅक सोसायटीचे चेअरमन माननीय नंदूशेठ, गावाचे सरपंच, ग्रामसेवक, बाजार समितीचे सर्व संचालक तसेच लोणी बुद्रुक व लोणी खुर्द येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गुरुवार, ६ नोव्हेंबर, २०२५

श्रीरामपूरात विना नंबर प्लेट, काचांवर ब्लॅक फिल्म, आवाजाच्या सायलेन्सर दुचाकी सह वाहनांवर कारवाया अतिरिक्त पोलिस अधीक्षक वाघचौरे यांचे श्रीरामपूर शहरवासीयांन कौतुकांचा वर्षाव

श्रीरामपूरात  विना नंबर प्लेट, काचांवर  ब्लॅक फिल्म, आवाजाच्या सायलेन्सर दुचाकी सह वाहनांवर कारवाया 
अतिरिक्त पोलिस अधीक्षक वाघचौरे यांचे श्रीरामपूर शहरवासीयांन कौतुकांचा वर्षाव 


  
 श्रीरामपूर 
 श्रीरामपूर शहरामध्ये मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाईची मोहीम श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. त्यामध्ये मुख्यत्वे करून विना नंबर प्लेट वाहने, ब्लॅक फिल्म लावण्यात आलेली वाहने व मॉडिफाइड तिरकस आवाजाचे सायलेन्सर लावण्यात आलेली दुचाकी वाहने यांच्यावर कारवाया करण्यात आल्या.
    या मोहिमेदरम्यान एकूण ८९ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. विना नंबर प्लेटची वाहने विविध गुन्ह्यात वापरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे वाहनांच्या काचांवर ब्लॅक फिल्म लावण्या वर देखील मनाई आहे असे असतानाही काही वाहन चालक सर्वच काचांवर ब्लॅक फिल्म लावतात. आगामी निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर वरील दोनही प्रकारच्या वाहनांवर अर्थात विना नंबर प्लेट वाहने व ब्लॅक फिल्म लावण्यात आलेल्या वाहनांवर मोटर वाहन कायद्याखाली दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये १३ चार चाकी वाहनांवर ब्लॅक फिल्म लावण्यात आलेल्या मिळून आल्या या सर्व वाहनांच्या ब्लॅक फिल्म जागेवरच काढून टाकण्यात आल्या व त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
   
  तसेच मॉडिफाइड सायलेन्सर लावण्यात आलेल्या ५ दुचाकी वाहनांवर देखील कारवाई केली. मॉडिफाइड सायलेन्सर च्या कर्ण कर्कश  आवाजाचा त्रास विद्यार्थी,सिनिअर सिटीजन, तसेच जवळून जाणाऱ्या नागरिकांना त्रास होतो. ही वाहने ताब्यात घेऊन जप्त करण्यात आली व मूळ सायलेन्सर बदलून मगच सोडण्यात आली. 
      सदरच्या कारवाया जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचे सूचनेनुसार, पोलीस उपाधीक्षक जयदत्त भवर, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, पोलीस, पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम श्रीरामपूर शहर,  शिर्डी येथील वाहतूक शाखेचे कर्मचारी, तसेच श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे वाहतूक शाखेचे कर्मचारी व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांच्याकडील RCP पथक यांनी केली आहे.
---+ श्रीरामपूर शहरा बरोबरच इतर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रभारी यांना विना नंबर प्लेट,फिल्मी ब्लॅक काचा त्याच बरोबरच कर्ण कर्करश आवाजाचे सायलेन्सर वेगवेगळ्या आवाजाचे हॉर्न त्याच बरोबर सध्या ऊस वाहतूक सुरू झाली असून ट्रॅक्टरवर असणारे टेप रेकॉर्ड, रात्रीं चमकणाऱ्या लाल पट्या आदी बाबत सुचना केल्या असून तातडीने कारवाया करण्याचे आदेश देण्यात आले - सोमनाथ वाघचौरे 
अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर 

 श्रीरामपूर शहरात काल दिवसभर अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या कारवाया मुळे श्रीरामपूरांनी वाघचौरे साहेब, तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांनवर अभिनंदनाचा वर्षाव करत असून नगरपालिका स्थानिक स्वराज्य निवडणुका लक्षात घेवून आणखी कारवाया वाढल्या पाहिजे - ॲड सुभाषराव जंगले 
उपाध्यक्ष बार असोसिएशन श्रीरामपूर

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...