रविवार, ७ सप्टेंबर, २०२५

ग्रामीण साहित्याचा पाया हा खेड्यातच सापडतो: राजेंद्र फंड

ग्रामीण साहित्याचा पाया हा खेड्यातच सापडतो: राजेंद्र फंड
            

   साहित्याची मुळे आणि ग्रामीण मातीचा सुवास  हा मराठी साहित्याचा पाया आहे.ग्रामीण साहित्याची ओळख  म्हणजे केवळ गावरान बोलीचा वापर नाही, तर त्यामागचं जगणं, संघर्ष, आनंद, दुःख, सण, परंपरा, लोककला यांचं जिवंत चित्रण आहे. गावाकडं सापडणारी माणुसकी, श्रमाचं पावित्र्य, निसर्गाशी असलेलं नातं—हे सारे ग्रामीण साहित्याचा आत्मा आहे. आणि हा आत्मा म्हणजेच ग्रामीण साहित्याचा पाया हा खेड्यातच सापडतो. असे प्रतिपादन साहित्यिक राजेंद्र फंड यांनी तिसरे ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदावरून बोलतांना म्हटले आहे. 
                    निमगाव वाघा येथील परिवार मंगल कार्यालय येथे स्व. पैलवान किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवक मंडळ , धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय व पैलवान नाना डोंगरे व्यायाम शाळा यांच्या वतीने या संमेलनाचे आयोजनक पै. नाना डोंगरे सौ मंदाताई डोंगरे पै. संदीप डोंगरे कुमारी प्रतिमा डोंगरे यांनी या संमेलनाचे आयोजन केले होते. या  संमेलनाचे स्वागताध्यक्ष ॲड . राजेश कातोरे,  प्रमुख अतिथी  मान. पल्लवी उंबरहंडे/ देशमुख , ॲड . सुरेश लगड, सरपंच सौ. उज्वला  कापसे , कवी आनंद साळवे हे होते. 
               आपल्या भाषणात ते आणखी म्हणाले की आज गावाकडं बदल होत आहेत. शेती संकटात आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीत, स्थलांतर वाढतंय, महिलांच्या समस्या तशाच आहेत. या सर्व गोष्टी साहित्याच्या माध्यमातून मांडल्या पाहिजेत. फक्त वर्णनात रमण्याची वेळ नाही, तर विचार, कृती, आणि परिवर्तनासाठी लेखणी वापरण्याची वेळ आहे.
            

       खरे तर निमगाव वाघा  येथील  पैलवानाच्या या आखाड्यात मातीतील, मॅटवरील कुस्तीप्रमाणेच  ग्रामीण भागात ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाद्वारे साहित्यिकांच्या साहित्याची कुस्ती लावण्याचे कसब नाना  डोंगरे हे अनेक वर्षांपासून करतात. व  या संमेलनास राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर  साहित्यिक हजेरी लावतात.  मराठी साहित्य व नवसाहित्यिक घडविण्याच्या यांची ही व अनेक वर्षांपासून होत असलेल्या या कार्यशाळा साहित्यिकांना नेहमीच प्रेरणादायी आहे. म्हणून या सर्व टीमचे मनापासून अभिनंदन आहे.
               या संमेलनात आयोजक नाना डोंगरे यांनी प्रास्ताविकात संस्था वर्षभर साहित्यिक, सांस्कृतिक, मैदानी खेळ,  राष्ट्रपुरुषांच्या जयंती, पुण्यस्मरणानिमित्त घेत असलेल्या वेगवेगळ्या उपक्रमाची माहिती दिली. संमेलनाध्यक्ष ॲड. राजेश कातोरे यांनी सर्व साहित्यिकांचे स्वागत केले. परिसंवादामध्ये ग्रामीण कथाकार श्री. बाळासाहेब देशमुख यांनी " पापी पेट का सवाल " ही कथा सादर केली. मान्यवरांच्या हस्ते समाजात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना मान. पल्लवी उंबरहंडे/ देशमुख व इतर सर्व पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. शेवटी राज्यस्तरीय कविसंमलनाचे  आयोजन ग्रामीण कवी गीतारामजी नरवडे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यभरातून आलेल्या अनेक कवींनी उत्कृष्ट कविता सादर करून  संपन्न झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...