रविवार, २१ सप्टेंबर, २०२५

लोणी येथील श्री म्हसोबा महाराज मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्याने फोडली

 लोणी येथील श्री म्हसोबा महाराज मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना घडली असून याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे यापूर्वी ही या मंदिरातून दानपेटी फोडण्यात आली पुन्हा अशीच घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे चोरीचा तपास सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे सुरू असून परिसरातील फुटेज तपासले जात आहेत ग्रामस्थांनी मंदिर परिसरात कायमस्वरूपी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे आणि रात्रीची पोलीस गस्त वाढवावी अशी मागणी केली आहे चोरट्यांनी कुलूप तोडून दानपेटीतील एकूण अंदाजे रक्कम सहा हजार रुपये चोरून घेऊन गेले असल्याची फिर्याद सुरेश धावणे लोणी पोलीस स्टेशन मध्ये दिली लोणी पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध भारतीय न्यायव्यवस्था कलम न्याय संहिता कलम 3.05(D).331(4) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास लोणी पोलीस करत आहेत
R. शिर्डी न्यूज
प्रतिनिधी ज्ञानेश्वर साबळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...