शुक्रवार, १९ सप्टेंबर, २०२५

मुळाथडी परीसरात गुरुवारी मध्यरात्री ढगफुटी सदृश परिस्थिती. पिकांसह जमिन वाहून गेली, आमदार लंघे सह तहसीलदार कडून पाहणी.

मुळाथडी परीसरात गुरुवारी मध्यरात्री ढगफुटी सदृश परिस्थिती. 

पिकांसह जमिन वाहून गेली, 
आमदार लंघे सह तहसीलदार कडून पाहणी.
पानेगांव (वार्ताहर):-
 नेवासा तालुक्यातील पश्चिम भागातील मुळाथडी परीसरातील निंभारी, अंमळनेर ,करजगांव, वाटापूर, तामसवाडी ,पानेगांव, शिरेगांव ,खेडलेपरमानंद, लांडेवाडी, गणेशवाडी, सह सोनई परीसरात गुरुवारी मध्यरात्री विजेचा कडकडाटासह ढगफुटी सदृश पाऊस प्रचंड परतीचा पाऊस झाला. सलग सहा दिवसांपासून होत असलेल्या पाऊसाने आणखी भर पडली शेतकऱ्यांचे होत्याचं नव्हतं झालं.
नेवास्याचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी तहसीलदार डॉ संजय बिरादार, यांना तातडीने परिस्थिती पाहणी दौऱ्याचं नियोजन करुन वरील गावांना भेटी देवून तलाठी, कृषी अधिकारी, स्थानिक ग्रामविकास अधिकारी महावितरण कर्मचारी हे बरोबर होते. ढगफुटी केंद्र बिंदू शिरेगांव, राजळे वस्ती, खेडलेपरमानंद येथे झाल्याचे शेतकरी तसेच शिरेगांव माजी सरपंच किरण जाधव यांनी आमदार लंघे यांना सांगितले. शेतामध्ये असणारे बाजरी, कपाशी, ऊस, मका,घास मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून येथे असणाऱ्या ओढा कडेचा जमिनी हि वाहून गेल्या असून ओढे नाले तुडुंब भरून वाहत असून सोनई कडे जाणारे रस्ते बंद झाले. करजगांव- गणेशवाडी, पानेगांव सोनई खेडलेपरमानंद शिरेगांव ओढ्याच्या पुलावरून  प्रचंड पाणी वाहत असल्याने  विद्यार्थी,कर्मचाऱ्यारी , दुकानदार, दूध उत्पादन शेतकरी यांना मोठी कसरत करावी लागली. तसेच काहिंना घरी थांबावे लागले. त्यामुळे दूध उत्पादक मोठे नुकसान झाले. पाहणी दौऱ्यात परीसरातील मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते.
+ प्रतिक्रिया- मुळाथडी परीसरात गुरुवारी मध्यरात्री ढगफुटी झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून आज च्या पाहणी दौऱ्यात तहसीलदार डॉ संजय बिरादार यांना सरसकट पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले - आमदार विठ्ठलराव लंघे पाटील 
+ प्रतिक्रिया- मुळाथडी परीसरात झालेली ढगफुटीने शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले असून महसूल प्रशासनाला सरसकटपणे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहे - तहसीलदार डॉ संजय बिरादार नेवासा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...