13 वे अखिल भारतीय शेतकरी मराठी साहित्य संमेलनाच्या कविसंमेलनाध्यक्षपदी राजेंद्र फंड:
प्रख्यात शेतकरी नेते शरद जोशी हे जसे शेतकऱ्यांचे नेते म्हणून प्रसिद्ध होते तसे ते उत्तम लेखक ही होते. त्यांच्या साहित्याचा देशभरात नव्हे तर जगभरात विविध भाषांमध्ये आवृत्त्या निघाल्या आहेत. भारतातील साहित्यिकांना त्यांच्या साहित्याची ओळख होण्याच्या दृष्टिकोनातून शेतकरी चळवळीच्या माध्यमातून शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते साहित्यिक गंगाधर मुटे यांनी अखिल भारतीय शेतकरी मराठी साहित्य संमेलन भरवणे सुरू केले. त्याद्वारे शरद जोशी यांच्या साहित्याचा व शेतकरी साहित्याचा प्रचार प्रसार सुरू झाला. शेतकरी गझल उपक्रम या साहित्य संमेलनाची देणगी आहे. या शेतकरी साहित्य संमेलनाने आतापर्यंत एवढी उंची गाठली की नामवंत साहित्यिक, शेतकरी नेते, राजकारणी आणि सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात होणाऱ्या या अखिल भारतीय शेतकरी मराठी साहित्य संमेलनात हजेरी लावली आहे.
दिनांक 3 ते 9 सप्टेंबर पर्यंत होणाऱ्या ऑनलाइन साहित्य संमेलनामध्ये रविवार दि. 7 सप्टेंबर रोजी रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत होणाऱ्या ऑनलाइन तेरावे अखिल भारतीय शेतकरी मराठी साहित्य संमेलनाच्या कवी संमेलनाचे अध्यक्षपदी कवी राजेंद्र फंड यांची तिसऱ्यांदा निवड झाली आहे त्यांच्या निवडीबद्दल ग्रामसेवा संदेश साहित्य परिवार ,शब्दगंध साहित्य परिवार , लायन्स क्लब ऑफ राहाता सह्याद्री, सह्याद्री ट्रेकिंग ग्रुप यांचे वतीने अभिनंदन होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा