अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे मानवी परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे असे मनोगत प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.ममता पिपाडा यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ यांची जयंती साजरी करताना बोलताना व्यक्त केले. या कार्यक्रमाप्रसंगी भाजपा नेते डॉ.राजेंद्र पिपाड़ा,आरपीयाचे नेते दिलीपराव वाघमारे,प्रगतशील शेतकरी शिवाजीराव आनप,मदनलाल पिपाडा, मदनभाऊ तारगे ,गोरखनाथ पवार,मयुरशेठ कुंभकर्ण आदी यावेळी उपस्थित होते.
लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.ममता पिपाडा यांनी आण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेचे पुजन करुन त्यांना अभिवादन केले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना त्या पुढे म्हणाल्या की, अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते. आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक हे त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात. संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकमानसात रुजविण्याचे काम शाहीर अण्णा भाऊ साठे यांनी केले. अण्णा भाऊ साठे कम्युनिस्ट कार्यकर्त्यां सोबत काम करतानाच, त्यांच्याकडून धुळाक्षरे गिरविण्यास सुरवात केली आणि ते कार्यकर्त्यांच्या बरोबरीने लिहायला, वाचायला शिकले.त्यांची सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयांवरील समज वाढू लागली.त्यांच्यातील उपजत असलेला कवी, लेखक, कलावंत आपल्या गाण्यातून,पोवाड्यातून व्यक्त होऊ लागला.त्यांनी आयुष्यातील पहीलं गाणं,धारावीला लागुन असलेल्या लेबर कॅम्पच्या झोपडपट्टीतील मच्छरावर लिहिले.नंतर त्यांनीं धनिकांकडून होणाऱ्या कामगारांच्या शोषणाविरुद्ध, “एकजुटीचा नेता झाला कामगार तय्यार ..किंवा धर्मांधांच्या छळवणूकीवर प्रहार करणारे ” जग बदल घालूनी घाव, सांगुनी गेले मला भीमराव..हे गीत लिहीले होते. सुप्रसिद्ध मुंबईची लावणी,माझी मैना,अशी अनेक गाजलेली गाणी लिहिली.आणि हळूहळू पुढे ते लोकनाट्य ,कथा, कादंबरी,लिहू लागले. वारणेचा वाघ, चित्रा,वैजयंता फकिरा कादंबरी नंतर एक सर्जनशील, समर्थ लेखक म्हणून कॉ. अण्णा भाऊ साठे यांची देशाला आणि जगाला ओळख झाली.त्यांच्या साहित्याला अनेक पुरस्कार मिळाले. त्यांच्या कथा, कादंबऱ्यांचे जगातील अन्य भाषात अनुवाद झाले.
यावेळी उपस्थित सर्वांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन करुन त्यांना अभिवादन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा