नर्मदा परिक्रमा पूर्ण झाली हा आमच्या जीवनातील परमोच्च आनंद - ह. भ . प.पाडेकर माऊली
वीरभद्र क्रीडा मंडळाचे सदस्य तसेच मार्गदर्शक ह.भ. प. चांगदेव महाराज पाडेकर व ह.भ. प. सुभाष महाराज चौधरी यांनी शंभर दिवस प्रवास करून नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. त्याबद्दल त्यांचा ज्येष्ठ नागरिक मंच राहता व शिक्षक संघ राहता तालुका यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. तसेच राहता तालुक्यातील ज्येष्ठ मार्गदर्शक ,माजी प्राचार्य, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त श्री सर्जेराव मते सर यांची सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक संघटना अध्यक्षपदी व स्वामी विवेकानंद पतसंस्था तज्ञ संचालक पदी निवड झाली ,तसेच माजी सेवानिवृत्त प्राचार्य नानासाहेब मते सर यांची रयत शिक्षण संस्थेच्या आजीव सभासदांमधून सातारा येथे जनरल बॉडी सदस्य म्हणून निवड झाली ,श्री ज्ञानेश्वर जाधव यांची राहता तालुक्यातील अस्तगाव येथे केंद्रप्रमुख म्हणून बदली झाली, त्याचप्रमाणे राहता येथील नामांकित उद्योजक श्री मुन्नाभाई शहा यांचाही वाढदिवस या ठिकाणी सत्कार करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पत्रकार रामभाऊ लोंढे ,शिक्षक नेते दत्ता गायकवाड, संजय वाघमारे, यांची मनोगते झाली .त्याचप्रमाणे ह. भ . प . पाडेकर माऊली आणि सुभाष महाराज चौधरी यांनी नर्मदा परिक्रमातील अनुभव सांगितले.
त्याचप्रमाणे सर्व सत्कारमूर्तींचे सत्कार करून आपण सर्वांनी आमचा आनंद द्विगुणीत केला याबद्दल प्राचार्य सर्जेराव मते सर यांनी सर्वांचे आभार मानले .या कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक मंचाचे अण्णासाहेब निरगुडे, पोपट घोगळ ,नामदेव लावरे ,रावसाहेब घाडगे, सूर्यभान चिकणे, पंढरीनाथ काकडे ,राजेश वाघमारे ,रामभाऊ लोंढे, भाऊसाहेब मेहत्रे ,बाळासाहेब बोरकर ,उमेश तुपे, डॉक्टर संजय उबाळे, तसेच शिक्षक प्रतिनिधी श्री सुनील गायकवाड, अशोक गुरव, विनोद तोरणे ,गणेश जाधव हे उपस्थित होते .शिक्षक नेते श्री दत्ता गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले
कार्यक्रमाचे आभार संघटनेचे संजय वाघमारे यांनी मानले .ज्येष्ठ नागरिक मंचाचे सर्व सदस्य त्याचप्रमाणे शिक्षक संघ राहता तालुका सर्व सदस्य आणि राहता तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा