सोमवार, १० मार्च, २०२५

जागतिक महिला दिनी शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा देणाऱ्या महिलांचा सन्मान :

जागतिक महिला दिनी शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा देणाऱ्या महिलांचा  सन्मान :
 
      
राहाता 
  सेवेचा अत्यल्प लाभ मिळवणारा घटक म्हणजे  स्री असते. घरात काम करत असेल तर सेवेचा मोबदला हा शून्य असतो. तर खाजगी व्यवसायात काम  करत असेल तर नगण्य मोबदला दिला जातो. शासकीय कार्यालयात सेवा देत असेल तर पुरुषांच्या बरोबरीने सेवेचा मोबदला मिळतो. आणि त्यांना मानसन्मान ही मिळतो. म्हणून  स्वच्छता व  आरोग्य क्षेत्रात अत्यल्प पगारावर  काम करणाऱ्या काही  खाजगी हॉस्पिटलमधील  उपस्थित सर्वच महिला  डॉक्टर्स , नसिंग स्टाफ , स्वच्छता महिला कर्मचारी यांचा सन्मान  त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन करण्याचा मनोदय  लायन्स क्लब राहाता सह्याद्रीचे वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने घेण्यात आला. 
             


       त्यानुसार दिनांक 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राहाता शहरातील लायन्स क्लब राहाता सह्याद्रीचे व्हाइस प्रेसिडेंट ला. स्वाधीन गाडेकर यांचे गाडेकर हॉस्पिटल, क्लबचे लीडरशिप  चेअरमन ला. डॉ. दत्ता कानडे, क्लब सर्व्हिस चेअरमन ला. डॉ. मिलिंद नाईक, गेट को ऑर्डिनेटर ला. डॉ. वैभव मालकर यांच्या हॉस्पिटलमधील महिला डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, स्वच्छता महिला कर्मचारी यांचा त्यांच्या हॉस्पिटल मध्ये जाऊन महिला दिनाच्या निमित्ताने साईबाबांचे महावस्त्र , पुष्पगुच्छ व मिठाई देऊन करण्यात आले. यावेळी नर्सिंग स्टाफ व महिला स्वच्छता कर्मचारी भाऊक झाल्या. जीवनात पहिली शाल मिळाल्याचे अनेक महिला कर्मचारी यांनी आनंदाश्रु व्यक्त करत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. यावेळी आमचे सर्व लायन्स डॉक्टर्स यांनी सर्व स्टाफला व  लायन्स सदस्यांना महिला दिनाच्या निमित्ताने  आईस्क्रीम/  लस्सीची मेजवानी दिली. 
                   हा उपक्रम म्हणजे निवडक महिला निवडून पुरस्कार देणे नव्हे तर जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने तेथील सर्व महिलांचा सन्मान आहे. आणि जागेवर जाऊन केल्याने डॉक्टर्स व महिला यांना त्याचा विशेष आनंद वाटला. 
              या उपक्रमाचे  प्रास्तविक  प्रेसिडेंट ला. राजेंद्र फंड, तर मनोगत  संस्थापक ला. विनोद गाडेकर, सत्यम सदाफळ, ला. मिनिनाथ तेलोरे , ला. सिराज शेख यांनी व्यक्त केले. आभार ला. सागर रोकडे यांनी मानले.
                   या  सन्मान उपक्रमासाठी  श्री. सुधाकर वाघ, श्री. अनिल देसाई, श्री. सुनील निकम हे मान्यवर तर संस्थापक ला . विनोद गाडेकर , प्रेसिडेंट ला. राजेंद्र व फंड, व्हाइस प्रेसिडेंट ला. सुनील धाडगे, सेक्रेटरी ला.  सागर रोकडे, ला. डॉ. दत्ता कांदे, ला. डॉ. वैभव मालकर, ला. डॉ. मिलिंद नाईक, ला. डॉ. स्वाधीन गाडेकर, ला. सत्यम सदाफळ, ला. सिराज शेख, ला. मिनिनाथ तेलोरे, ला. सचिन गाडेकर हे उपस्थित होते. या सर्वांच्या हस्ते आरोग्य क्षेत्रातील या महिला  दूतांचा सन्मान करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...