बुधवार, ५ फेब्रुवारी, २०२५

शिर्डी हत्याकांड प्रकरणी डॉ.राजेंद्र पिपाडा यांच्याकडुन मृतांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट.

 शिर्डी हत्याकांड प्रकरणी डॉ.राजेंद्र पिपाडा यांच्याकडुन मृतांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट.




राहाता
           वेगवेगळे ड्रग्स तसेच व्यसनाधीनतेचे साहित्य पुरवुन तरुणांची व्यसनाधीन पिढी बनविण्याचे व गुन्हेगार बनविण्याचे काम चालु असुन त्यामुळे हे व्यसनाचे साहीत्य पुरविणारे व विकणारे यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेणार आहोत अशी भावना डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी व्यक्त केली. यावेळी दिलीपराव वाघमारे,निखील पिपाडा आदी उपस्थित होते.
शिर्डी येथे संस्थानच्या कामगारांचे खुन झाले या प्रसंगी डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी संस्थान कामगारांच्या कुटुंबियांची भेट घेवुन सांत्वन केले व याप्रकरणाचा पाठपुरावा करुन आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. शिर्डी सध्या व्यसन करुन गुन्हेगारी कऱण्याचे प्रमाण वाढले असुन असे प्रकार रोखण्याची गरज आहे. या गुन्हेगारी मुळे सामान्य लोकांचे बळी जात आहे. शिर्डीतील कामगारांचे खुन हि घटना अत्यंत संतापजनक आहे. शिर्डीत गुन्हेगारांच्या टोळ्या वाढवल्या आहेत. त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.


शिर्डीत येणारे साईभक्तही सुरक्षित नाहीत चैन स्नॅकींग ,पाकीटमारी या गोष्टीही थांबविणे गरजेचे आहे. आजची घटना अतिषय दुर्दैवी आहे संस्थानमध्ये काम करणा-या कामगारांचे वेळापत्रकही बदलणे गरजेचे असुन रात्री काम करीत असलेल्या कामगारांना सकाळी 7 वाजे पर्यंतची वेळ ठेवुन पुढील शिफ्ट त्यानंतर सुरु केली पाहिजे. यासाठीही आपण लक्ष घालणार आहोत.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...