मंगळवार, ४ फेब्रुवारी, २०२५

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने आदिवासी बांधवांना जातीच्या दाखल्याचे वितरण

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने आदिवासी बांधवांना जातीच्या दाखल्याचे वितरण


साकुरी-
साकुरी परिसरामधील आदिवासी बांधवांना जातीच्या दाखल्याचे वितरण करण्यात आले
80%समाजकारण व 20%राजकारण या बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री श्री एकनाथ जी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे काम संपूर्ण राज्यात सुरू आहे याचाच एक सामाजिक दायित्व म्हणून शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष अहमदनगर जिल्हा यांच्या वतीने राहाता तालुक्यात आदिवासी बांधव यांना मोफत जातीच्या दाखल्यांचे वितरण करण्यात आले समाजातील गरीबातील गरीब नागरिक ज्यांचे जात प्रमाणपत्र काढणेसाठी अडचणी येतात अश्या नागरिकांना मदत करून जातीचे प्रमाणपत्र काढून देण्यासाठी मदत करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शीवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख श्री मंगेश चिवटे व श्रीराम राऊत यांनी केले होते त्यानुसार राहाता तालुक्यातील आदिवासी बांधवांना सदरील दाखल्याचे वाटप माजी खासदार सदाशिव लोखंडे, व शिवसेना जिल्हाप्रमुख श्री कमलाकर कोते यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हाप्रमुख श्री जितेंद्र जाधव यांनी वितरण केले सदरील कामी प्रांत अधिकारी श्री माणिक आहेर तहसीलदार श्री अमोल मोरे तसेच मंडळ अधिकारी मोहसीन  यांचे सहकार्य लाभले यावेळी श्री संतोष दंडवते,श्री अनिल दंडवते,दादासाहेन कुटे, शाम गायकवाड,सागर थोरात, किरण कुलथे आदी उपस्थित होते

*चौकट*
राहाता परिसरातील काही आदिवासी बांधवांना शासकीय योजनेचा लाभ घेणे साठी जात प्रमानपत्र आवश्यक होते आदिवासी बांधवांकडे काही कागदपत्रे अपुरी होती शासन स्तरावर या बांधवांना कागदपत्रासाठी मदत करून पूर्ण सहकार्य करण्यात आले
  मोहसीन शेख-मंडळ अधिकारी राहाता

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

माझ्या कार्यात मुळाथडी परीसराचं मोठं योगदान:-खासदार वाकचौरे

माझ्या कार्यात मुळाथडी परीसराचं मोठं योगदान:-खासदार वाकचौरे मुळाथडीच्या गावांना भरघोस निधी देणार  पानेगांव   नेवासे तसेच राहुरी ...