गुरुवार, ९ जानेवारी, २०२५

गायके पाटील परिवाराकडून डॉ विखे यांचा सन्मान

गायके पाटील परिवाराकडून डॉ विखे यांचा सन्मान


शिर्डी :-
     राज्यात नुकत्याच संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीत अहिल्यानगर  जिल्ह्यात महायुतीला मोठे यश संपादन करून दिल्याबद्दल शिर्डीतील  माजी नगरसेवक अशोक गायके , रविंद्र गायके, बाळासाहेब गायके ,यशवंतराव गायके, गणपतराव गायके, रावसाहेब गायके , नानासाहेब गायके यांनी डॉ सुजय विखे पाटील यांच्या भव्य सत्काराचे आयोजन करून मोठा सन्मान केला. 
          यावेळी डॉ सुजय विखे पाटील यांनी सत्काराचे आयोजन केल्याबद्दल गायके पाटील कुटुंबीयांचे तसेच त्यांच्या मित्र परिवाराचे आभार मानत शिर्डीतील सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली . या सत्कार सोहळ्याप्रसंगी  माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते, माजी उपनगराध्यक्ष अभय  शेळके  याचे भाषण झाले, यावेळी बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर  गोंदकर ,गोपीनाथ  गोंदकर,बाबासाहेब कोते, मधुकर कोते ,बाळासाहेब लूटे,तुषार गोंदकर,राजेंद्र हरिभाऊ गोंदकर ,विजय कोते,अरविंद अप्पा कोते,मंगेश त्रिभुवन, नितीन उत्तम कोते,  चेतन कोते  तसेच शिव छत्रपती प्रतिष्ठाणचे  सदस्य समस्त गायके  परिवाराचे व शिर्डी ग्रामस्थ उपस्थित होते. 
        यावेळी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केल्याने महिला वर्गाची कार्यक्रमाला मोठी पसंती होती,  सूत्रसंचालन रविंद्र गायके यांनी केले तर उपस्थितांचे आभार अशोक गायके यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...