धनगरवाडी येथे केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न ; धनगरवाडी शाळा अव्वल
धनगरवाडी.
राहाता तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा धनगरवाडी शाळेने रांजणखोल केंद्राच्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत सर्वाधिक स्पर्धा जिंकून नेत्रदीपक कामगिरी केली.
रांजणखोल केंद्राच्या क्रीडा स्पर्धा धनगरवाडी शाळेच्या मैदानात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या.धनगरवाडी गावचे सरपंच गोपीनाथ खरात,उपसरपंच साहेबराव आदमाने, माजी सरपंच भीमाशंकर लोखंडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जितेंद्र भोंडे,उपाध्यक्ष गणेश राशिनकर,पत्रकार बाबासाहेब मंडलिक,संतोष विठ्ठल राशिनकर,अशोक रक्टे, बाळासाहेब लांडे,प्रकाश लांडे,केंद्रसमन्वयक विश्वास टपळे,धनगरवाडीचे मुख्याध्यापक शरद होडगर,ममदापुर उर्दू शाळेचे मुख्याध्यापक अनिस शेख सर या मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भीमाशंकर लोखंडे होते.साहेबराव आदमाने यांनी सर्व स्पर्धकांना खेळ भावनेने निकोप वातावरणात स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
क्रीडा स्पर्धेत खोखो,कबड्डी, धावणे,उंच उडी,लांब उडी, गोळाफेक,थाळी फेक इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या.
स्पर्धेत रांजणखोल केंद्रातील 12 शाळेतील स्पर्धकांनी भाग घेतला.धनगरवाडी शाळेच्या संघांनी लहान गट मुले खोखो,लहान गट मुली खोखो,मोठा गट मुले खोखो,मोठा गट मुली खोखो,लहान गट मुले कबड्डी,लहान गट मुली कबड्डी,मोठा गट मुली कबड्डी या सांघिक प्रकारात विजेता झाली.या सर्व प्रकारात धनगरवाडी संघाची तालुकापातळीसाठी निवड झाली आहे.कबड्डी मुले मोठया गटात धनगरवाडी संघ उपविजेता ठरला.
वैयक्तिक प्रकारात लांब उडी लहान गटात कु.वैष्णवी भाऊसाहेब आदमाने हिचा प्रथम क्रमांक,मोठ्या गटात साक्षी बाळासाहेब आदमाने हिचा प्रथम क्रमांक,अक्षदा जालिंदर राशिनकर उंच उडी प्रथम,सायली बबन रक्टे हिने थाळी फेक व गोळा फेक प्रकारात प्रथम क्रमांक मिळविला.साई संतोष जगताप याने लांब उडी व गोळाफेक प्रकारात द्वितीय क्रमांक,रोहित भाऊसाहेब आदमाने याने धावणे व उंच उडी प्रकारात द्वितीय क्रमांक,साईराज किरण रक्टे याने थाळी फेक मध्ये द्वितीय क्रमांक मिळवले.श्रद्धा विजय लोखंडे हिने उंच उडीत द्वितीय,कृष्णा नानासाहेब रक्टे याने उंच उडीत द्वितीय,जय संजय साखरे याने धावणे प्रकारात तृतीय क्रमांक मिळविला.ज्ञानेश्वरी संतोष रक्टे हिने 100 मी.धावणे प्रकारात द्वितीय क्रमांक मिळविला.रांजणखोल केंद्रात सर्वाधिक स्पर्धा प्रकारात धनगरवाडी शाळा विजेती ठरली.केंद्रातील रांजणखोल,चितळी गाव,चितळी स्टेशन या शाळेतील स्पर्धकांनीही उत्कृष्ट कामगिरी केली.
स्पर्धेसाठी गटशिक्षणाधिकारी राजेश पावसे,विस्तार अधिकारी विष्णू कांबळे,केंद्रप्रमुख कानिफनाथ कोळेकर यांचे मार्गदर्शन लाभले.शाळेतील विद्यार्थ्यांची स्पर्धेची तयारी विजय जगताप,किशोर जगताप,अनिल धिरडे,गीता गलांडे,विवेक मोरे,युवा प्रशिक्षणार्थी आकाश राशिनकर यांनी घेतली.सर्व पालक व ग्रामस्थ यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
केंद्रस्तरीय स्पर्धेसाठी रांजणखोल केंद्रातील संजय आग्रे,दिपक अहिरे,सचिन विधाते,मनोज तायडे,प्रियंका ढोले,अनिल गिरमे,कामिनी कोष्टी, सविता मेहेत्रे,अनिस इनामदार, सुरेखा पवार,स्मिता माघाडे,जया गिर्हे,चंद्रभागा धिंदळे,सीमा देसाई,राजेंद्र घोडके,वैशाली डावखर,विनोद बनसोडे,शेख तेहेसीनसबा मुकीद,इसामुद्दीन शेख या शिक्षकांनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा