गुरुवार, ९ जानेवारी, २०२५

परीट धोबी समाजाचा उच्चस्तरीय रेशीमगाठी वधू वर मेळाव्यास मोठा प्रतिसाद मिळतोय :- )

परीट धोबी समाजाचा उच्चस्तरीय  रेशीमगाठी वधू वर मेळाव्यास मोठा प्रतिसाद मिळतोय :-
      


     पुणे येथे दिनांक 12 जानेवारी रोजी परीट धोबी समाजाचा उच्चस्तरीय रेशीमगाठी वधुवर परिचय मेळावा    माऊली मंगल कार्यालय कात्रज कोंढवा रोड कात्रज येथे संपन्न होतोय. या मेळाव्याचे हे चौथे वर्ष असून दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही उच्चस्तरीय शिक्षण घेतलेल्या व आयटी , डॉक्टर्स , परदेशात नोकरी करणारे मुले मुली यांनी जास्तीत जास्त नोंदी या मेळाव्यात केलेल्या आहेत . याचबरोबर या समाजातील  उच्चस्तरीय  असो वा नसो पण  विधवा, घटस्फोटित, विधुर  यांना ही आवाहन केल्याने त्यांच्या ही नोंदणी  मेळाव्यात झालेल्या  आहेत.
      या मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे वधू वर व त्यांचे पालक यांना चर्चा करण्यासाठी गार्डनमध्ये स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे जेणेकरून पाहुण्यांना बोलणी9। करण्यास बाहेर कुठे हॉटेलमध्ये किंवा इतर ठिकाणी जाण्याची वेळ येणार नाही किंवा थोड्याच कालावधीत  अनेक कुटुंबांना तेथेच चर्चा करण्यास वेळ मिळेल. याच मेळाव्यात  जर एखादा विवाह करण्यास दोन्ही बाजूची संमती दिली तर लगेच विवाह ही लावून देण्याची तयारी  या मंडळाने केली आहे. 
          पुणे येथे आयटी क्षेत्रातील मुला मुलींची संख्या जास्त असल्याने पालकांकडून या रेशीमगाठी मेळाव्यासाठी येण्यास पहिली पसंती त्यांनी दिली आहे असे वधूवरांच्या रजिस्ट्रेशन वरून दिसून येते .  दरवर्षी 25 पेक्षा जास्त विवाह या मेळाव्यात ठरल्याची आतापर्यंतची परंपरा आहे. म्हणून समाजातील पालकांचे प्रथम पसंती म्हणून रेशीमगाठी वधु वर मंडळाकडे नोंदणी केली आहे.  असे या मेळाव्याचे प्रमुख श्री अनिलजी हूपरीकर यांनी म्हटले आहे. या मेळाव्याच्या तयारीसाठी श्री. अनिलराव हुपरीकर  खडके  यांचे सोबत श्री. राजाभाऊ कदम, सौ. सुषमा अमृतकर, श्री. शांतीलाल कारंडे , श्री. महेश यादव, श्री किरण बांदेकर, श्री. राजेंद्र फंड, श्री. प्रशांत शिंदे आणि श्री. योगेश रोकडे हे झटत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...