शुक्रवार पासून राहत्यात जिल्हास्तरीय दोन दिवसीय तबलिगी इज्तेमाचे आयोजन......
70 एकराचे भव्य दिव्य मंडपात धार्मिक प्रवचनासाठी सुमारे पाच लाख बांधवांची उपस्थिती लाभणार... पार्किंग व जेवणावळी सर्व मिळून 40 एकरात स्वतंत्र मंडप
राजूभाई पठाण
राहाता तालुक्यातील निर्मळ पिंपरी गावाचे हद्दीत नगर ते सावळीविहीर या राजकीय महामार्गालगत आज शुक्रवार व शनिवार दि 10 व 11 जानेवारी रोजी दोन दिवसीय जिल्हास्तरीय तबलीगी इज्तेमा संपन्न होणार आहे या इज्तेमासाठी मुस्लिम समाज बांधवांनी जय्यत तयारी केली असून नगर जिल्ह्यातील हजारो मुस्लिम बांधव स्वेच्छेने इज्तेमात सहभागी होणार आहे जवळपास पाच लाखाचे दरम्यान बांधव या धार्मिक कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे धार्मिक प्रवचनासाठी सुमारे 70 एकर जागेवर पाचशे बाय साडेपाचशे आकाराचा मंडप उभारला गेला आहे त्याचप्रमाणे जेवणा करिता साठ बाय ऐंशी आकाराचे चार स्वतंत्र मंडप तसेच पिण्याचे पाण्याच्या व्यवस्थेकरीता 15 बाय 30 आकाराचे सात मंडप उभारले आहे स्वच्छतागृहांची पुरेशी व स्वतंत्र व्यवस्था केली गेली आहे त्याचप्रमाणे जिल्हाभरातून येणाऱ्या वाहनांचे पार्किंग करीता वेगवेगळ्या ठिकाणी मिळून एकूण सत्तर एकरावर नऊ वाहन तळ निर्माण केले आहे वाहतुकीची कोंडी होणार नाही तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही याची विशेष काळजी घेतली गेली आहे या प्रत्येक ठिकाणी स्वयंसेवकांची नियुक्ती केली असून आवश्यक व महत्त्वपूर्ण ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बसविण्यात आले आहे या कार्यक्रमा निमित्त जिल्हाभरातून येणाऱ्या बांधवांची कुठल्याही प्रकारची गैरसोय अथवा असुविधा होऊ नये म्हणून यासाठीची विशेष काळजी घेतली जात आहे मदतनीस व स्वयंसेवकां कडून दक्षता घेतली जात आहे कार्यक्रम स्थळी सुमारे 70 एकर जागेत भव्य दिव्य असा मंडप उभारण्यात आलेला आहे भाविकांची एक लाखाचे आसपास संख्येने उपस्थिती लाभणार असल्याने त्या तुलनेत पिण्याच्या पाण्याची जेवणाची तसेच राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे 10 व 11 जानेवारी प्रत्येक नमाज नंतर प्रवचन होईल तर 11 जानेवारीला संध्याकाळी आठ वाजता प्रार्थना दुवा होईल व त्यानंतर इस्तेमाची समाप्ती होणार. असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे या इज्तेमा कार्यक्रमासाठी राज्याचे जलसंधारण मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील माजी खासदार डॉ सुजय दादा विखे पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे निर्मळ पिंपरी गावातील मिळकत धारक शेतकऱ्यांनी कार्यक्रमासाठी जमिनीचे महत्त्वपूर्ण सहकार्य व योगदान दिले आहे त्याचप्रमाणे या धार्मिक कार्यक्रमासाठी साईबाबा संस्थान तर्फे तसेच राहाता येथील डॉक्टर मैड मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल राहाता ग्रामीण रुग्णालय यांच्या वतीने वैद्यकीय सेवा सुविधा पुरवली जाणार आहे निर्मळ पिंपरी ग्रामपंचायतीचे मोठे योगदान या कार्यक्रमासाठी लाभत आहे पोलीस प्रशासनाचे बंदोबस्त कामी महत्त्वपूर्ण सहकार्य या कार्यक्रमासाठी मिळणार आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा