धनगरवाडीत पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी साजरी .
धनगरवाडी राहाता तालुक्यातील धनगरवाडी येथे व अहिल्यादेवीनगर येथे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची 229 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.प्रथम धनगरवाडीत मारुती मंदिर येथे माजी सरपंच राजू रक्टे यांनी प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. अहिल्यादेवी नगर येथे लोकनियुक्त सरपंच गोपीनाथ खरात यांनी प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला .या कार्यक्रमाला दिगंबर रक्टे , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जितेंद्र भोंडे, चांगदेव रक्टे, शिवाजी रक्टे, दौलत झनान , गणपत लांडे, पत्रकार बाबासाहेब मंडलिक, वैभव राशिनकर , विलास मंडलिक, संकेत मंडलिक, इत्यादी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा