सोमवार, २ सप्टेंबर, २०२४

पोळा सण हा शेतकरी त्यांचा जिवलग मित्र असलेल्या बैलांप्रती आणि त्याच्या कष्टांप्रती एक कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो - प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.ममता पिपाडा


पोळा सण हा शेतकरी त्यांचा जिवलग मित्र असलेल्या बैलांप्रती आणि त्याच्या कष्टांप्रती एक कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो - प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.ममता पिपाडा 

राहाता -

        बैल पोळा हा सण दिवसभर शेतात शेतक-यांसोबत काबाड कष्ट करणा-या बैल या प्राण्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. अशी भावना प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.ममता पिपाडा यांनी बैलपोळा सण साजरा करताना व्यक्त केली. पिपाडा कुटुंबियांनी त्यांच्या निवासस्थानी बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त केली यावेळी डॉ.राजेंद्र पिपाडा,मदनलाल पिपाडा,प्रगतशील शेतकरी शिवाजी आनप,सागर आनप,लिलाबाई पिपाडा,महावीर पिपाडा,माया पिपाडा,श्रृती पिपाडा,निखील पिपाडा,साहिल पिपाडा आदी यावेळी उपस्थित होते.

              यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना सौ.ममता पिपाडा म्हणाल्या की, पोळा सण हा शेतकरी त्यांचा जिवलग मित्र असलेल्या बैलांप्रती आणि त्याच्या कष्टांप्रती एक कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो. या सणाचे महत्त्व शेतकऱ्यांमध्ये जास्त प्रमाणात असते कारण बैल म्हणजे शेतकऱ्याचे मित्र. त्याच्याच जीवावर शेतकरी शेत नांगरतो, जमिनीतून धान्य पिकवतो. शेतकऱ्या प्रमाणे बैलही शेतात रात्रंदिवस राबतात, कष्ट करतात. त्यांना या दिवशी आराम दिला जातो. हा सण प्रामुख्याने गावात आणि खेड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. किंवा अशा सर्वच ठिकाणी जिथे शेतकरी आणि बैल असतात. मात्र बहुत करून पोळ्याची धूम ही खेडेगावातच जास्त पाहायला मिळते.

              हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. अतिशय पवित्र महिना म्हणून श्रावणाला ओळखले जाते. श्रावण महिन्याच्या अमावस्या तिथीला बैलपोळा साजरा केला जातो. संपूर्ण देशभरात विविध नावांनी पोळा साजरा केला जातो. महाराष्ट्रात हा सण बैलपोळा नावाने साजरा केला जातो. आपला देश कृषीप्रधान असून, शेतकरी हा आपल्या देशाचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. सर्वच शेतकऱ्यांचा जिवाभावाचा मित्र म्हणून बैलाला ओळखले जाते. याच बैलामुळे शेतकऱ्याला शेतातील पिक पिकवण्यासाठी मोठी मदत होते. त्यामुळे या दिवशी महाराष्ट्रात बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा साजरा करण्याची पद्धत आहे. आपल्या देशात आणि धर्मात आपण तर विविध सण साजरे करतो, मात्र सोबतच आपल्या पशु पक्ष्यांसाठी आणि इतर पाळीव प्राण्यांसाठी देखील सण साजरे करण्याची परंपरा आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

महिला सामाजिक कार्यकर्ती व साहित्यिकांचा होणार विशेष गौरवशब्दगंध च्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

महिला सामाजिक कार्यकर्ती व साहित्यिकांचा होणार विशेष गौरव शब्दगंध च्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय अहिल्यानगर  शब्दगंध साहित्यिक ...