नवनवीन उपक्रमांद्वारे समाज प्रबोधन करणारे राहाता येथील साईयोग फाउंडेशन द्वारे यावर्षी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
संस्थापक अध्यक्ष डॉ बापूसाहेब पानगव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान,वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन मोहीम,मोफत योग प्राणायाम वर्ग व शिबिरे तसेच राहाता शिर्डी साई सायकल परिक्रमा द्वारे पर्यावरण व आरोग्य संतुलन करण्याचे कार्य साईयोग फाउंडेशन द्वारे गेली अनेक वर्षांपासून अविरत चालू आहे.यावर्षी पर्यावरण पूरक शाडूची गणेशमूर्तीची पारंपरिक पद्धतीने बैलगाडीतून मिरवणूक ढोलताशाच्या गजरात काढून लोकरुची नगर येथे साईयोग फाऊंडेशनचे जेष्ठ सदस्य भरत दवंगे यांच्या प्रांगणात श्री व सौ.उज्वला विष्णू गाडेकर तसेच श्री व सौ ताईबाई विठ्ठल निर्मळ यांच्या हस्ते विधिवत पूजा करून स्थापना करण्यात आली.सुंदर व शोभिवंत हिरवेगार झाडांची आरास करण्यात आली आहे.दररोज मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात येणार आहे.तसेच विसर्जन मिरवणूक देखील पारंपरिक पद्धतीने काढून गणेशमूर्तीचे विसर्जन पाट अथवा विहिरीत न करता मोठ्या बादलीत करून ते पाणी फाउंडेशनने लावलेल्या झाडांना देण्यात येणार आहे.अश्याप्रकरे आम्ही पाणी,हवा व ध्वनी प्रदूषण टाळून पर्यावरण रक्षणाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करत आहोत असे गणेशोत्सव समितीचे प्रमुख रविंद्र धस,मनोज पिपाडा,व्यंकटेश अहिरे,बबलू फटांगरे,मोहन तांबे आदी म्हणाले.
याप्रसंगी साईयोग फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ बापूसाहेब पानगव्हाणे,दशरथ तुपे,भरत दवंगे,ॲड गोरख दंडवते,शिवाजी आनप,ॲड दत्तात्रय धनवटे,रविंद्र धस,मनोज पिपाडा,बबलू फटांगरे,व्यंकटेश अहिरे,मोहन तांबे,बाळासाहेब गाडेकर,भाऊसाहेब बनकर,संजय बाबर,अरविंद बावके,दिपक दंडवते,सिताराम बावके,दिपक गाडेकर,परमेश चव्हाण,शिवाजी पोटे,प्रणव लावर,माजी नगरसेविका अनुराधा तुपे,रुपाली दवंगे,आशा पिपाडा,किरण धस,भूपाली अहिरे,मंगल फटांगरे,उज्वला गाडेकर,ताईबाई निर्मळ,गौरी नागरे,साईशा चव्हाण,रूपाली पिपाडा,वैष्णवी पिपाडा,अर्जुन चव्हाण,अवधूत अहिरे, देवांश अहिरे,पिया बाबर आदी मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा